शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : संशयित पकडले, पण सूत्रधारांचं काय? डॉ. हमीद दाभोलकरांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 20:56 IST

डॉ .नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयितांना पकडण्यात आलं. मात्र, अद्याप सूत्रधार कोण आहे. हे समजू शकले नाही.

ठळक मुद्दे'अंनिस' तर्फे डॉ नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहाचे आयोजन

पुणे : डॉ .नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्ष होत आहेत. त्या प्रकरणातील संशयितांना पडकण्यात आलं. मात्र, अद्याप सूत्रधार कोण आहे. हे समजू शकले नाही. त्यांना कधी पकडणार असा सवाल 'अंनिस'चे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ हमीद दाभोलकर यांनी शासनाला केला आहे. तसेच सीबीआयने ह्याची केस न्यायालयात लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केली. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्युला २० ऑगस्ट २०२१ ला अर्ह आठ वर्ष पूर्ण होत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेले डॉ वीरेंद्र तावडे यांना २०१६ साली, २०१८ मध्ये शरद कळसकर , सचिन अंदुरे,तर २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्ययात आले. तर अमित डीगवेकर व राजेश बंगेरा या संशियनताच्या विरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. डॉ दाभोलकर, कॉ. गोविद पानसरे , प्रा कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयित आरोपी समान आहे. त्यामुळे हा विचार संपविण्याचा षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत असल्याचे डॉ हमीद दाभोलकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मिलींद देशमुख , नंदिनी जाधव , श्रीपाल लालवाणी , डॉ अरुण बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते. विचारांचा असा होणार ऑनलाईन जागर :अंनिस च्या वतीने १४ ते २० ऑगस्ट दरम्यान डॉ नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्तहाचे आयोजन करण्यात आले. यातील सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी सहा वाजता होणार आहे.शनिवार १४ ऑगस्ट : अंध रूढींच्या  बेड्या तोड अभियान या विषयवार नंदिनी जाधव बोलतील. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची उपस्थिती असेल.रविवार १५ ऑगस्ट : हिंसा के खिलाफ ... मानवता की और या विषयावर अंशुल छत्रपती यांची मुलाखत होणार आहे.सोमवार १६ ऑगस्ट : सामाजिक चळवळी आणि माध्यमे या विषयांवर जेष्ठ पत्रकार संजय आवटे हे विचार मांडतील.मंगळवार १७ आगस्ट : बालसाहित्यावरील पाच पुस्तकांचे  प्रकाशन होईल.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुशील शुक्ल यांची उपस्थिती असेल.बुधवार १८ ऑगस्ट : राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन या विषयांवर  परिसंवादाचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी डॉ विवेक मॉन्टेरो यांची उपस्थति असेल.गुरुवार १९ ऑगस्ट : भोर येथे ५० व्यक्तींच्या  उपस्थितीत   विचार संमेलन होईल. यावेळी डॉ शैला दाभोलकर , डॉ दत्तप्रसाद दाभोलकर , आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.शुक्रवार २० ऑगस्ट : ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ भारयीय लोकतंत्र व विवेकवादी शक्ती समोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.हा कार्यक्रम अंनिसच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रसारण होईल. १९ ऑगस्ट रोजी  सायंकाळी  विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मेणबत्ती घेऊन अभिवादन केले जाईल तर २० ऑगस्ट ला सकाळी आठ वाजता देखील अभिवादनाचा कार्यक्रम होईल.   

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर