शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death : नवनिर्वाचित खासदारांना द्यायच्या 'हा' कानमंत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 14:57 IST

कोणत्याही पदावर कष्ट आणि जिद्दीशिवाय पोचता येत नाही. त्यामुळे साध्या कार्यकर्त्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंतचा सुषमा स्वराज यांचाही प्रवास तितका सोपा नव्हता.

पुणे : कोणत्याही पदावर कष्ट आणि जिद्दीशिवाय पोचता येत नाही. त्यामुळे साध्या कार्यकर्त्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंतचा सुषमा स्वराज यांचाही प्रवास तितका सोपा नव्हता. अतिशय कणखर नेत्या म्ह्णून काम करत असताना लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या नेत्यांनाही त्या खास शैलीत मार्गदर्शन करत असत. पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी त्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. 

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. काल रात्री 9 च्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

 त्यांच्याविषयी बोलताना शिरोळे लोकमतला म्हणाले की, 'सुषमाजी या अतिशय स्पष्टवक्त्या, अभ्यासू आणि मूल्यांवर निष्ठा ठेवणाऱ्या नेत्या होत्या. मी २०१४साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्यावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते. लोकसभा अधिवेशन काळात जास्तीतजास्त वेळ सभागृहात बसून विविध विषयांवरील चर्चा ऐकण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. स्वतःचे भाषण झाल्यावर निघून न जाता बाकीच्यांचे म्हणणे ऐकण्याचा त्यांचा सल्ला कामकाज समजून घेताना मला प्रचंड उपयोगी पडला.

  

दुसरी आठवण म्हणजे त्या माणसांची ओळख वैशिष्ट्यांसह लक्षात ठेवत असत. आमच्यावेळी ज्येष्ठ खासदारांचे गट करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असू. सुदैवाने मला सुषमाजींच्या गटात काम करण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी माझी ओळख करून देताना त्यांनी 'ये अनिल शिरोले जीं हैं, पुने से है और हमारे मुंडे साहब के मित्र हैं'. माझ्यासाठी ही ओळख कायम लक्षात राहणारी आहे. कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्या भारतात असोत किंवा परदेशात परंतु त्यांचे मंत्रालय शब्दशः २४ बाय ७ सुरु असायचे. कितीतरी वेळा परदेशात अडकलेल्या किंवा अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी फोन करता क्षणीच त्यांनी मदतीला सुरुवात केल्याचे अनुभव आले होते. पक्षाची बैठक असो किंवा संसदेतील भाषणे त्या पूर्ण तयारी करूनच बोलायच्या. त्यामुळे त्यांचा मुद्दा कायमच स्पष्टपणे आणि सोप्या भाषेत कोणतीही गुंतागुंत न करता त्या मांडायच्या. आज मोदी सरकारचा दुसरा टप्पा सुरु असताना त्यांची राहून राहून आठवण येत राहील. त्यांच्यासारख्या अनुभवी आणि कुशल व्यक्तीची देशाला गरज होती. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजDeathमृत्यूBJPभाजपा