सूर्यदत्ता पुरस्काराचे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST2021-02-07T04:11:01+5:302021-02-07T04:11:01+5:30

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या २३ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. राज्यपाल यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ ...

Suryadatta Award distribution today | सूर्यदत्ता पुरस्काराचे आज वितरण

सूर्यदत्ता पुरस्काराचे आज वितरण

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या २३ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. राज्यपाल यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनिजी, भजनसम्राट अनुप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांच्या उपस्थितीत पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी दिली.

यंदा ''सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार'' स्वर्गीय डॉ. टी. बी. सोलाबक्कणवार , ज्येष्ठ चरित्र अभिनेते किरण कुमार, उद्योजक अभया श्रीश्रीमल जैन , विज्ञान- तंत्रज्ञ डॉ. मुकुंद गुर्जर, दिग्दर्शक विक्रम राजदान, डॉ. आर. एम. अग्रवाल , कृष्ण प्रकाश , ज्योत्स्ना चोपडा यांना प्रदान केला जाईल. तर सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार'' पंडित विजय घाटे , डॉ. अद्याशा दास ,अभिनेता अजिंक्य देव , प्रेरक वक्ता साजन शाह, उद्योजक लावण्या राजा, रिया जैन ,राधिका ए.जे. यांना प्रदान दिला जाणार आहे,असेही संजय चोरडिया यांनी सांगितले.

Web Title: Suryadatta Award distribution today