शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक..! १३ बोटी नष्ट, २ कोटी ६० लाखांचा फटका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 10:39 IST

या कारवाईमुळे वाळू माफियांना तब्बल २ कोटी ६० लाखांचा फटका बसला आहे.  

इंदापूर -पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांवर जोरदार कारवाई करत प्रशासनाने उजनी पाणलोट क्षेत्रात मोठी धडक दिली. इंदापूर तालुका ते बिटरगाव वांगी या परिसरात वाळू उपसा करणाऱ्या १३ बोटी पकडून बुडवण्यात आल्या, तर ३ सक्शन बोटी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळू माफियांना तब्बल २ कोटी ६० लाखांचा फटका बसला आहे.  संयुक्त मोहिमेचा दणकासोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.  ड्रोनच्या मदतीने ‘ऑपरेशन क्लीन अप’माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगीपर्यंत पाठलाग करत या पथकाने वाळू माफियांच्या बोटी पकडल्या आणि बुडवून नष्ट केल्या. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर यांच्या मदतीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे पार पाडली गेली.  वाळू माफियांना इशारा..! इंदापूरचे माजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सहभागामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या धडक कारवाईचा अनुभव आणि प्रभाव ओळखून माफियांना प्रशासनाचा कडक इशारा मिळाला आहे.  वाळू माफियांवरची ही कारवाई फक्त सुरुवात आहे का? वाळू माफियांवर झालेल्या या महासर्जिकल स्ट्राइकनंतर पुढील कारवाई काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या या धडक पावलांमुळे वाळू माफियांचा पुढील डावपेच काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड