शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये विजांच्या प्रकाशात गांधीजींवर झाली होती ‘शस्त्रक्रिया’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:37 IST

बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला.

ठळक मुद्देससूनच्या इमारतीवर ‘महात्मा गांधी स्मारक’ अशी आठवण कोरून ठेवली

पुणे आणि महात्मा गांधी यांचे एक अद्वितीय असं नातं होतं. १८ मार्च १९२२ रोजी महात्मा गांधी यांना अहमदाबादच्या सत्र न्यायाधीशांनी देशद्रोहासाठी सहा वर्षांची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली होती. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीमागे भारतीय राष्ट्राच्या मूर्त प्रतीकाला बंदिस्त करण्यात आले होते. त्यांच्यावर तुरुंगाचे मॅन्युअल कठोरपणे लागू करण्यात आले होते आणि तरीही गांधीजी तुरुंगात ‘मुक्त पक्ष्या’सारखे आनंदात वावरत होते. बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला. १२ जानेवारी १९२४ च्या  रात्री  चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, राज्यकैदी गांधीजींवर  कर्नल मॅडॉक यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान विद्युतप्रवाह खंडित झाला. चक्रीवादळातील विजांच्या प्रकाशात गांधी यांची ‘अपँडेटॉमी’ची शस्त्रक्रिया पूर्ण करावी लागली. गांधीजींनी शल्यविशारदांचे आभार मानले आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध जुळले.  ४ फेब्रुवारी रोजी शासनाने अनपेक्षितपणे गांधीजींच्या शिक्षेतील काही भाग कमी केला आणि गांधीजींची विनाअट मुक्तता केली. तेव्हा ‘माझ्या सुटकेमुळे मला काहीच दिलासा मिळालेला नाही,’ अशी गांधीजींची प्रतिक्रिया होती. ४ ऑगस्ट १९३३ रोजी  गांधीजींना पुणे शहराच्या हद्दीत राहण्यासाठी संयमीपणा दाखविण्यास सांगण्यात आले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना एक वर्ष कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येरवडा कारागृहात हरिजनचे काम करण्यास नकार दिल्याने त्यांनी १८ ऑगस्ट रोजी ‘आमरण’ उपोषण सुरू केले. दि. २१ ऑगस्ट रोजी गांधीजींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. गांधीजींनी प्रार्थना केली आणि संत्राचा ज्यूस पिऊन  उपवास तोडला. ससूनच्या इमारतीवर ‘महात्मा गांधी स्मारक’ अशी आठवण कोरून ठेवली असल्याची माहिती ससून प्रशासनाने दिली.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीsasoon hospitalससून हॉस्पिटल