शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभूंनी मदतीचा हात दिला अन् तब्बल दोन महिने फ्रान्समध्ये अडकलेला 'शुभम'कुटुंबाला परत मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 13:56 IST

या कुटुंबाने मुलाला भारतात परत आणण्यासाठी अनेक नेते, मंत्री, यांना फोन करुन, प्रत्यक्ष त्यांच्या घराचे उंबरे झिजवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली...

पुणे: कोरोनाने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली अन् अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करत आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे देश विदेशात अनेकजण अडकून पडले. माणुसकीच्या भावनेतून भारताने परदेशात अडकलेल्या अनेकांना विमानाने मायदेशी परत आणले. मात्र, इतर देशांत अडकलेल्यांची संख्या प्रचंड मोठी असल्याने सर्वांनाच तातडीने परत आणणे सरकारलाही शक्य नव्हते. असाच एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण फ्रान्स येथे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात इंटर्नशिप करण्यासाठी गेला होता. त्याची इंटर्नंशिप संपत आली आणि तिथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन जाहीर झाला. तब्बल दोन महिने तेथे अडकल्यामुळे त्याच्याकडचे पैसेही संपत आले होते. कुटुंबाने मुलाला भारतात परत आणण्यासाठी अनेक नेते, मंत्री, यांना फोन करुन, प्रत्यक्ष त्यांच्या घराचे उंबरे झिजवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, प्रश्न जागतिक पातळीवरचा असल्याने सर्वचजण हतबल होते. त्याचवेळी या कुटुंबाच्या मदतीला धावून आले ते माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू. त्यांच्या प्रयत्नांमुळे तो मुलगा मायदेशी परतला तेव्हा या कुटुंबाच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले. सुरेश प्रभू यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

मूळचे मदनसुरी (ता .निलंगा) येथील व सध्या पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते संजीव माने यांचा मुलगा फ्रान्स येथे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात इंटर्नशिप करण्यासाठी गेला होता.परदेशात शिक्षणासाठी गेलेला माने कुटुंबातील हा पहिलाच मुलगा.त्याची इंटरंशिप संपायची वेळ आली आणि फ्रान्समध्ये कडक लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे जागतिक विमानसेवा संपूर्ण बंद झाली व शुभम फ्रान्समध्ये अडकला गेला. तब्बल दोन महिने तेथे अडकल्यामुळे त्याच्याकडचे पैसेही संपत आले होते. घरची परिस्थिती मध्यमच. रात्रंदिवस हे कुटुंब अस्वस्थ होऊन परमेश्वराचा धावा करत होत. तसेच राजकीय नेतमंडळी यांना भेटून याबाबत मदत करण्याची विनंती करत होते पण जागतिक पातळीवरचे काम असल्यामुळे परिस्थितीत काही सुधारणा होत नव्हती.अशातच त्यांनी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्याशी संपर्क साधून सविस्तर वृत्तांत सांगितला. कोहिनकर यांनी त्वरित राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्याची विनंती केली .सुरेश प्रभू यांनी त्वरित फ्रान्स मंत्रालयाशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले .सुरेश प्रभू यांच्या फोनमुळे फ्रान्स मंत्रालयाने शुभमला लवकरात लवकर निघणाऱ्या विमानात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले व त्याचप्रमाणे त्याला वैयक्तिक मदतही केली. अखेर बुधवारी (दि. २७) सकाळी शुभम मायदेशी परतला. माने कुटुंबांनी अश्रू ढाळत सुरेश प्रभूंविषयी आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेFranceफ्रान्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuresh Prabhuसुरेश प्रभू