शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुरेंद्र गडलिंग यांना सायबर लॉचे शिक्षण नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 03:11 IST

माओवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांनी सायबर लॉचे शिक्षण घेण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी नाकारला.

पुणे : माओवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांनी सायबर लॉचे शिक्षण घेण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी नाकारला.सायबर कायद्याच्या शिक्षणासाठी परवानगी दिल्यास कारागृहातील वायफाय हॅक होऊ शकते. येथील डेटा चोरीला जाऊ शकतो. तसेच शिक्षण घेण्याच्या बहाण्याने आतापर्यंत हाती न आलेला डेडा डिलीट करण्याची शक्यता आहे, असे आदेशात नमूद करण्यात होते. गडलिंग यांनी मुक्त विद्यापीठातून सायबर लॉची पदविकेचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे नमूद केले होते. कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहामध्ये कला आणि वाणिज्यची पदवी घेण्याची सुविधा असून सायबर लॉची पदविका करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे म्हणणे मांडले.सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या सायबर लॉचे शिक्षण घेण्याला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने पदविकेची सुविधा कारागृहात उपलब्ध नाही. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्य इंटरनेटची सुविधा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी नाकारली.पत्नी व मुलांचे पत्र मिळाले नाहीगडलिंग यांनी गरम कपडे, हातमोजे आणि वही आणि कलर पेन्सिलची मागणी केली. मात्र, पेन्सिल आणि वही देण्यास काही हरकत नसून गरम कपडे आणि हातमोजे कारागृह प्रशासनाला विचारून द्यावे लागेल, असा आक्षेप अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी घेतला. पत्नीने आणि मुलाने पाठविलेली पत्रे कारागृह अधिकाऱ्यांनी मला न देता ती परत पाठविल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. कारागृह प्रशासनाने असे का केले, असा प्रश्न गडलिंग यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Puneपुणे