शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शहरातील वाहतूक पोलिसांच्या ई-चलनवर ‘अधिभार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:07 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून नागरिकांना मार्च महिन्यापासून ई-चलन देण्यात येत आहे. प्रत्येक ई-चलनामागे नागरिकांच्या खात्यातून दंडाव्यतिरिक्त साडेतीन रुपये वजा होत

विशाल शिर्केपुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून नागरिकांना मार्च महिन्यापासून ई-चलन देण्यात येत आहे. प्रत्येक ई-चलनामागे नागरिकांच्या खात्यातून दंडाव्यतिरिक्त साडेतीन रुपये वजा होत असून, ही रक्कम करारातील रकमेच्या अडीचपट आहे. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपये संबंधित कंपनीच्या खिशात गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.राज्याच्या गृह विभागाने आॅक्टोबर २०१६मध्ये २५ महापालिकांमध्ये ई-चलन प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला होता. एक राज्य एक चलन या तत्त्वानुसार ही पद्धत सुरु करण्यात येत आहे. त्या अंतर्गत मार्च २०१७ पासून पुण्यासह विविध महापालिकांमध्ये वाहतुकीच्या उल्लंघनासाठी ई-चलन फाडण्यात येत आहे. शहरात २९ मार्च २०१७ ते ३० जुलैअखेरीस १ लाख ७१ हजार ७०३ नागरिकांकडून ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांची वसुली झाली होती. तर अनपेड केस अंतर्गत १ लाख ३४ हजार १०८ जणांवर कारवाई करण्यात आली होती. ही रक्कम देखील ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ इतकी आहे. म्हणजेच दर महिन्याला सरासरी साठ हजारांहून अधिक वाहतूक उल्लंघनाच्या घटना घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी ई-चलन पद्धत राबविण्यासाठी आयटी सोल्युशन या कंपनीशी करार केला आहे. पोलिसांकडे ४९१ ई-चलन यंत्रे असून, त्या माध्यमातून दंडाची वसुली केली जाते. या कंपनीशी करण्यात आलेल्या करारातही संबंधित कंपनीला एक रुपया मानधन देण्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक विभागाकडे माहिती मागितली असता त्यांनी दंडाव्यतिरिक्त आकारली जाणारी ३.४५रुपये रक्कम संबंधित आयटी सोल्युशन्स कंपनीची असल्याचे उत्तर माहिती अधिकारात दिले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांना ही माहिती दिली आहे.दंडाच्या रकमेमध्ये एक रुपया देखील सेवाशुल्क आकारणे चुकीचे आहे. म्हणजे दंडाची पावती देताना, पावतीचे शुल्क आकारण्यासारखेच झाले. खरे तर, आॅफलाइन पद्धतीनेदेखील पैसे भरण्याची सुविधा असायला हवी. पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे देखील अशी मागणी केल्याचे खान यांनी सांगितले.ई चलन भरण्यासाठी नागरिकांच्या खात्यात पैसेच नसतील अथवा संबंधित व्यक्ती डेबिट कार्ड वापरत नसल्यास सध्या एका मोबाइल कंपनीच्या नावाने असलेल्या स्टोअर्समध्ये पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, ही स्टोअर्स जवळ नसल्यास पैसे भरण्यासाठी अडचण उद्भवत आहे. आॅफलाइनसाठी अद्याप पर्यायी सुविधा नसल्याचे उत्तर वाहतूक विभागाने दिले आहे.निविदेविनाच दिले कंपनीला कामसंबंधित कंपनीला ई चलनाचे काम देताना कोणतीही निविदा न काढल्याची कबुली वाहतूक पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे. निविदा प्रक्रिया न राबविता अशा पद्धतीने काम देण्याचा अधिकार वाहतूक विभागाला आहे काय, या प्रश्नावर मात्र, सदरची माहिती पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखेच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे