शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule | भावी मुख्यमंत्रीच्या पोस्टरवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; मुंबई पोलिसांना केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:06 IST

मंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा...

पुणे : राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांचे फोटो लावलेले पोस्टर मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावर सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री होणार असल्याचा उल्लेख केला आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टरवरून जोरदार राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत. या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. मंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.

आज खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही', असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

माझा फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का? असा प्रतिप्रश्न सुळे यांनी केला. पोस्टरबाबत पत्रकारांकडूनच यासंबंधी मला माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने, व्यक्तिने लावले आहे का याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे या आज बारामती लोकसभा मतदारसंघातील गाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

अजित पवारांच्या पोस्टरवर प्रतिक्रिया-

सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना अजित पवारांच्या पोस्टरवरही प्रतिक्रिया दिली. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरवर त्या बोलल्या. जयंत पाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझ्या आणि अजितदादांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे. दोन्ही पोस्टरवर पोस्टर लावणऱ्याचं नाव नाहीये. त्यामुळे हा आमच्या दोघांवर अन्याय आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी कारवाई करावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र