परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र यावे: सुप्रिया सुळे
By Admin | Updated: March 26, 2015 00:23 IST2015-03-26T00:23:15+5:302015-03-26T00:23:15+5:30
आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. महिलांनी स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी एक पाऊल उचलले आहे.
परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र यावे: सुप्रिया सुळे
पुणे : आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. महिलांनी स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. समाज परिवर्तनासाठी आपण सर्वांनी राजकारण विसरून एकत्र येऊन काम करावे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
चेंजमेकर या लोकल एरिया मॅनेजमेंटच्या बुधवारी झालेल्या उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात सुळे बोलत होत्या. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात विजेत्या महिलांच्या गटांना सुळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी खासदार वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, चंचला कोद्रे, वैशाली बनकर, बापू पठारे, रवींद्र माळवदकर, दर्शना परमार, सुरेश जगताप आदी उपस्थित होते. धनकवडे म्हणाले, ‘‘प्रशासन आपले काम करतच आहे, पण महिलांनीसुद्धा त्या कामात सहभाग दर्शविला, तर उत्तम पुणे शहर होण्यास मदत होईल. आपले शहर सुधारण्यास आपणच पुढाकार घेतला पाहिजे.’’ (प्रतिनिधी)