शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत आल्या तर त्यांचं स्वागतच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:29 IST

अर्थमंत्री येणार असतील तर त्यांचे स्वागतच...

भोर (पुणे) : भाजपचे एक देश, एक पक्ष धोरण असून विरोधी पक्षाला संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. केंद्राचे माझ्या मतदारसंघावर केंद्राचे अधिक लक्ष असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघात येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. भोर येथील यशवंत लाॅन्स येथे विविध विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा देव, जि.प. माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, मानसिंग धुमाळ, विठ्ठल शिंदे, नितीन धारणे, गणेश खुटवड, विलास वरे, युवराज जेधे, केदार देशपांडे, मनोज खोपडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात आढावा बैठकीच्या आयोजनाची माहिती रणजीत शिवतरे यांनी दिली. सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाला पक्ष वाढवायची मुभा आहे. त्यात वेगळे काही नाही. यामुळे अर्थमंत्री येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. आघाडी सरकार पाडल्यानंतर मंत्रिमंडळ करायला एक महिना उशीर लावला आहे. पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे पालकमंत्री लवकर नियुक्त करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी निकृष्ट बांधकामे, भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीला विलंब, रस्ते खराब झाले आहेत. बालकाचे कुपोषण वाढत आहे, प्राथमिक शाळेत शिक्षक कमी आहेत. एसटी सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामीण गावे अंधारात येतात. भोर नगरपालिकेकडून मंजूर केलेला निधी वापरला जात नाही, बचत गटांचे सक्षमीकरण करावे, अशा मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या.

भोरचा नेकलेस पाॅइंट डेव्हलप करणार

भोर-पुणे रस्त्यावरील खंडोबाचा माळ येथील निरा नदीवर तयार झालेला नेकलेस पाॅइंट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे हा नेकलेस पाॅइंट डेव्हलप करून सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ, तसेच रायरेश्वर रोहिडा तोरणा किल्ला येथेही पर्यटनास विकास करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन