शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

‘त्या’ गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने केला फडणवीस यांचा अपमान- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:58 IST

१०५ आमदार निवडून आले असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केले नाही?...

बारामती (पुणे) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपशी युती हवी होती. मात्र, मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस नको होते, असे वक्तव्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. पत्रकारांनी याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामती येथे बोलताना लक्ष वेधले. त्यावर सुळे यांनी त्यांचे १०५ आमदार निवडून आले असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केले नाही? ४० आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने फडणवीस यांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

सुळे पुढे म्हणाल्या, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, १०५ आमदार असलेला राष्ट्रीय पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पवार चालवतात एवढी त्यांची ताकद आहे. हे कबूल केल्याबद्दल मी भाजप प्रदेशाध्यक्षांचे आभार मानते, असा टोला सुळे यांनी लगावला.

सिलिंडरचा भाव महाग झाला आहे. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर आला आहे. महागाई, बेरोजगारी आहे. सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे इतिहासात जाण्यात अर्थ नाही. इतिहासाचा अभ्यास कधीही करता येईल; पण आकडोंसे पेट नही भरता, जब भूख लगती है तो धान लगता आहे, हे सुषमा स्वराज यांचे वाक्य मला आठवतेय, असे ते म्हणाल्या. ज्या पद्धतीने सत्तेचा संघर्ष झाला, ज्या पद्धतीने दिल्लीच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचा घाट घातला, यातून तुम्ही काय ते बघा. महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठे षडयंत्र केंद्र करतेय, असे सुळे म्हणाल्या.

मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणे, महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या विरोधातील षड्यंत्र हे दिल्लीतून होतेय. त्यातून पहाटेच्या शपथविधीचा वारंवार उल्लेख होतो आहे. तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, परंतु त्यांच्या वक्तव्यातून त्यांना या शपथविधीची कल्पना होती का, हे सांगता येत नाही, मी वास्तवतेत जगते, इतिहासात नाही, असे त्या म्हणाल्या.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास ‘इलेक्शन’ मोडमध्ये आहेत. राज्यात एमपीएससी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षक आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. परंतु, हे लोक निवडणूक आयोग, न्यायालय यासाठी व स्वत:ची खुर्ची, स्वत:ची सत्ता वाचविण्यासाठी वेळ खर्ची घालत आहेत, असे खासदार सुळे म्हणाल्या. ईडी सरकार स्वत:ची खुर्ची वाचविण्यात व्यस्त असून, ते असंवेदनशील सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही. अंगणवाडी सेविकांच्या वेदना त्यांना दिसत नाहीत, अशी टीका सुळे यांनी केली.

मराठी माणसाने काढलेला पक्ष...-

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निश्चित केला होता. त्या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह अन्य नेते हजर होते. राज ठाकरे यांनी मतभेद झाल्यावर स्वत:चा वेगळा पक्ष काढला. ते चिन्ह, पक्ष ओरबाडत बसले नाहीत. तशी संधी यांनाही होती. परंतु, एका मराठी माणसाने काढलेला पक्ष दिल्लीच्या तख्ताला सहन होत नसेल, त्यातून हे घडले आहे. परंतु, अखेर सत्याचा विजय होईल, असे सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBaramatiबारामतीBJPभाजपा