‘किस ऑफ लव्ह’ला पाठिंबा
By Admin | Updated: November 13, 2014 00:20 IST2014-11-13T00:20:36+5:302014-11-13T00:20:36+5:30
देशभर वादग्रस्त ठरत असलेल्या ‘किस ऑफ लव्ह’ आंदोलनास पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्र्यासह युवा भारत संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला.
‘किस ऑफ लव्ह’ला पाठिंबा
पुणो : देशभर वादग्रस्त ठरत असलेल्या ‘किस ऑफ लव्ह’ आंदोलनास पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्र्यासह युवा भारत संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला. त्याचप्रमाणो समाजात उघडय़ावर अश्लील चाळे करण्यास कोणीही पाठिंबा देणार नाही. परंतु, निसर्गाकडून स्त्री-पुरुषांना देण्यात आलेला प्रेम करण्याच्या अधिकारापासून त्यांना हिरावून घेऊ नका, अशी भूमिका या विद्याथ्र्यानी सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात स्पष्टपणो मांडली.
लव्ह जिहादच्या नावाखाली स्त्रीपुरुषांचा प्रेम करण्याचा नैसर्गिक अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेतला जात आहे. त्याचप्रमाणो अंतरजातीय विवाह करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांवर समाजाकडून अत्याचार केले जात आहेत. महाराष्ट्रीतील जातीयवाद अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळेच खर्डा गावात नितीन आगेसारख्या तरुणाचा निर्घृन खून केला जातो. यामुळे ‘किस ऑफ लव्ह’ या आंदोलनाकडे संकुचितदृष्टीने न पाहता व्यापक दृष्टीने पाहावे, अशी भूमिका युवा भारत, नव समाजवादी पर्याय आदी संघटनांकडून मांडण्यात आली. (प्रतिनिधी)
1 युवा भारत संघटनेने ‘किस ऑफ लव्ह’ या विषयावर चर्चा करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु,विद्यापीठाने त्यास परवानगी नाकारली.
2 तरीही सुमारे 5क् विद्यार्थी या विषयावर चर्चा करण्यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागे जमले. त्यानंतर विद्यापीठाने पोलीस बंदोबस्त मागवला. परंतु, विद्यार्थी केवळ चर्चा करत असल्याने पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.
3 जमा झालेल्या विद्याथ्र्यामध्ये परदेशी विद्याथ्र्याचाही समावेश होता. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह घटना न घडता ‘किस ऑफ लव्ह’ आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक संपली.