शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विविध पिकांच्या ७ लाख क्विंटल बियाणांचा राज्यात पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:16 IST

यावर्षी राज्यात खरीप हंगामात सुमारे १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने सुमारे ४० लाख टन खतांचा पुरवठा मंजूरयंदा तृणधान्य, कडधान्य आणि इतर बियाणांची १६ लाख २५ हजार ७८९ क्विंटल बियाणांची गरज

पुणे : खरीप हंगामासाठी राज्यात विविध पिकांच्या १६ लाख ६३ हजार ७५० क्विंटल बियाणांचे नियोजन केले असून त्यापैकी ७ लाख ११ हजार ५७२ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच ४३ लाख टन खत पुरवठ्याचे नियोजन आहे. त्यापैकी १३ लाख टन खताचा पुरवठा मे महिना अखेरपर्यंत झाला आहे. यावर्षी राज्यात खरीप हंगामात सुमारे १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कापूस आणि सोयाबीनचे प्रत्येकी ३६ लाख हेक्टर, भात आणि तूर प्रत्येकी १६ लाख हेक्टर, मका ९ लाख ३० हजार हेक्टर आणि तेलबियांचे ३९ लाख ६९ हजार हेक्टरवर पेरण्या होतील. गेल्यावर्षी ३६ लाख ५८ हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, केंद्र सरकारने सुमारे ४० लाख टन खतांचा पुरवठा मंजूर केला आहे. या खरीप हंगामात ४३ लाख टन खतांची मागणी गृहीत धरुन नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मंजुर केलेल्या ४० लाख टन खतामध्ये १५ लाख टन युरिया, साडेचार लाख डीएपी, ३ लाख एमओपी, संयुक्त खते ११, एसएसपी ६ लाख आणि इतर खतांचे प्रमाण ५० हजार टन इतके आहे. यंदा तृणधान्य, कडधान्य आणि इतर बियाणांची १६ लाख २५ हजार ७८९ क्विंटल बियाणांची गरज भासेल. त्यापैकी १६ लाख ६३ हजार ७५० क्विंटल बियाणांची उपलब्धता करण्यात आली असून, ७ लाख ११ हजार ५७२ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात संकरीत ज्वारी ८ हजार ४४९, देशी ज्वारी ५०, संकरीत बाजरी ४ हजार २०९, भात ८६ हजार ७८९, मका ४ हजार ७९४, तूर ९ हजार ६०४, मूग ३ हजार ३३२, उडीद १३ हजार २१८, सोयाबीन ५ लाख ७२ हजार ५०, बीटी कापूस  ९ हजार ६८ क्विंटल बियाणांचा पुरवठा २ जून अखेरीस करण्यात आला आहे. ............................................ 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीGovernmentसरकारFarmerशेतकरी