हडपसर, येरवडा परिसराचा पुरवठा विस्कळीत

By Admin | Updated: July 26, 2014 00:39 IST2014-07-26T00:39:49+5:302014-07-26T00:39:49+5:30

पहिल्याच दिवशी हडपसर, येरवडा; तसेच लष्कर परिसरातील काही भागास आज पाणी बंदचा सामना करावा लागला.

The supplies of Hadapsar, Yerwada area are disrupted | हडपसर, येरवडा परिसराचा पुरवठा विस्कळीत

हडपसर, येरवडा परिसराचा पुरवठा विस्कळीत

पुणो :  महापालिकेने शहरात आज पासून एकवेळ पाणी देण्यात येत असले तरी, पहिल्याच दिवशी हडपसर, येरवडा; तसेच लष्कर परिसरातील काही भागास आज पाणी बंदचा सामना करावा लागला.   पूलगेटजवळ जुन्या इमारतीची भिंत गुरुवारी रात्री मुठा कालव्यात पडल्याने धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी आज लष्कर जलकेंद्रातून येरवडा; तसेच हडपसर भागात केला जाणारा पाणीपुरवठा शुक्रवारी विस्कळीत झाला. संपूर्ण दिवस काम करूनही, हे काम पूर्ण न झाल्याने किमान दोन दिवस या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत आणि कमी दाबाने राहणार असल्याचे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी कुलकर्णी यांनी सांगितले. 
गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रत चांगला पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठय़ाने 1क् टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर येथील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले जाणार आहे. कालव्यातून दिले जाणारे पाणी घेऊन लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या हडपसर गाव, एमआयडीसी, रामवाडी यासह येरवडा परिसरातील अनेक भागाला पाणीपुरवठा केला जातो. पूलगेटजवळ असलेल्या जुन्या इमारतीची भिंत कोसळल्याने कालव्यातून सोडल्या जाणा:या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे लष्कर जलकेंद्रातून करण्यात येणारा 
पाणीपुरवठा आज विस्कळीत 
झाला होता. तसेच, पुढील दोन 
दिवस हे काम सुरू असेर्पयत, या भागांमध्ये काही ठिकाणी कमी 
दाबाने पाणीपुरवठा होणार 
असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले 
आहे. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: The supplies of Hadapsar, Yerwada area are disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.