शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घुबडांबाबतची अंधश्रद्धा दूर व्हायला हवी : पक्षितज्ज्ञ डॉ. जेम्स डंकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 13:49 IST

अंधश्रद्धा दूर होऊन पक्ष्यांना वाचविणे आवश्यक...

ठळक मुद्देजागतिक घुबड परिषदेचे उद्घाटनघुबडांची संख्या वाढविणे आणि टिकवून ठेवायला, या परिषदेचा उपयोग

पुणे : भारतामध्ये घुबड या पक्ष्याबाबत खूप अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे या पक्ष्यांची वसतिस्थाने नष्ट होत असून, जे शिल्लक आहेत ते धोक्यात आली आहेत. अंधश्रद्धा दूर होऊन त्यांना वाचविणे आवश्यक आहे. ही  जागतिक परिषद त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. घुबडांची संख्या वाढविणे आणि टिकवून ठेवायला, या परिषदेचा उपयोग होईल, असे  जागतिक घुबड परिषदेचे समन्वयक आणि पक्षितज्ज्ञ डॉ. जेम्स डंकन यांनी सांगितले. तस्करी आणि जादूटोण्यामुळे घुबडांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आजपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक घुबड परिषद सुरू झाली आहे. त्यामध्ये जगभरातील १६ संशोधक आले आहेत. इला फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवशास्त्र, पर्यावरण शास्त्र विभाग यांच्यातर्फे ही परिषद होत आहे.  पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रमुख पाहुणे वन विभागाचे मुख्य वन्यजीव संरक्षक नितीन काकोडकर, जागतिक घुबड परिषदेचे समन्वयक जेम्स डंकन, इस्रायलचे प्रख्यात पक्षितज्ज्ञ रुवेन योसेफ, इला फाउंडेशनचे प्रमुख आणि संयोजक डॉ. सतीश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा. कल्पना पै यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. जागतिक पातळीवर या परिषदेचे यंदा सहावे वर्ष आहे. या घुबडांच्या छायाचित्र आणि माहिती पत्रकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. भारत आणि अन्य देशांतील संस्कृतीमधील घुबडविषयक संकल्पना या सत्रात भारतीय संस्कृतीतील घुबड या विषयावर  डॉ. सुरुची पांडे यांनी विचार मांडले.  डॉ. काकोडकर म्हणाले की, घुबडांना वाचविणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये घुबडाला महत्त्व दिले पाहिजे. वन विभागाकडून घुबडावर अभ्यास करण्यात येईल. तसेच ही परिषद त्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यापीठानेदेखील हातभार लावला पाहिजे. कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीत निसर्गाला महत्त्व दिले आहे.  त्यामुळे  निसर्ग-पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र येऊन घुबडांचे आणि एकूणच पर्यावरणाचे संवर्धन करायला पुढे येणे आवश्यक आहे. ........प्रदर्शनात घुबडांची माहिती ४प्रदर्शनात घुबाडांचे छायाचित्रे, त्यांचा अधिवास, त्यांच्याविषयीची माहिती आदी नागरिकांना पहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात येऊन हे प्रदर्शन पहावे, असे आवाहन डॉ. सतीश पांडे यांनी केले. ....तीन, चार डिसेंबरला पिंगोरीत उलुक उत्सव ४या परिषदेनंतर ३ आणि ४ डिसेंबरला इला फाउंडेशनच्या पिंगोरी येथील इला हॅबिटॅटमध्ये ग्रामीण अभ्यास केंद्रात उलुक उत्सव होणार आहे. ४या महोत्सवात घुबडविषयक कीर्तन, कविता, नृत्य, नाटक, एकपात्री, लघुपट, फेस पेंटिंग, रांगोळी, छायाचित्रांचा समावेश आहे. राज्यभरातून घुबड प्रदर्शनासाठी सुमारे २ हजार जणांनी चित्रे पाठविली आहेत. त्यामध्ये निलगीरची टोपी, कागद, वनस्पती आदींपासून घुबडांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. 

टॅग्स :Puneपुणे