येथील ९ जागांसाठी २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. तर माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ३ जागा बिनविरोध होऊन ६ जागांसाठी १२ उमेदवार राहिल्याने सरळ लढत होत असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बाजीराव सुर्यवंशी यांनी दिली.
बाबुर्डी अंतर्गत शेरेचीवाडी व लव्हे, ढोपरे, गायकवाड, खोरे आदी वस्त्या येत आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधून दोन जागा बिनविरोध झाल्या असून विद्यमान सदस्या आणि माजी सरपंच यांच्यात सरळ लढत होत आहे.
प्रभाग क्रमांक २ मधुन भैरवनाथ पॅनलचे मनिषा गोविंद बाचकर या बिनविरोध झाल्या आहेत. तर राहिलेल्या दोन जागांसाठी भैरवनाथ पॅनलचे दोन उमेदवार यांच्या विरोधात अपक्ष दोन उमेदवार असून त्यापैकी एक विद्यमान सरपंच पुन्हा नशीब आजमावित आहेत. तर प्रभाग क्रमांक ३ मधून तीन जागांसाठी काळभैरवनाथ पॅनलचे तीन तर त्यांच्या विरोधात भैरवनाथ जोगेश्वरी पॅनलचे तीन उमेदवार निवडणूक लढवित आहेत.