शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
2
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
3
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
4
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
5
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
6
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
7
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
8
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
9
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
10
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
11
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
12
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!
13
"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
14
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
15
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
16
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
17
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
18
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
19
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
20
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार

Maval Assembly Election 2024 result: मावळात अजित पवार गटाचे सुनील शेळके ५ हजार मतांनी आघाडीवर; भेगडे पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:06 IST

Maval Assembly Election 2024 result: बापू भेगडे अपक्ष उमेदवार असून महविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे

पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे सुनील शेळके ३२९१ मतांनी आघाडीवर तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे २१०८ मतं मिळाली आहेत. तर शेळके यांना ५३९९ मतं मिळाली आहेत. यंदा सुनील शेळके यांच्या विरोधात मावळचे सर्व पदाधिकारी उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीने सुद्धा या मतदार संघात उमेदवार न देता शेळके याना पाठिंबा दिला आहे. आता हे मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लाख लागून आहे. 

मावळ मतदारसंघात २०१९ ला ७१.१० टक्के, तर यावेळी ७२.५९ टक्के मतदान झाले. जास्तीच्या मतदानाचा फायदा दोन्ही उमेदवार आपल्यालाच होणार असल्याचे सांगत आहेत. वाढलेले मतदान हे विद्यमानांच्या विरोधात जाते, असा इतिहास असला तरी यावेळी वाढलेला दीड टक्का महायुतीच्या सुनील शेळके यांना आघाडी मिळवून देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच वेळी अपक्षाला पाठिंब्याचा ‘मावळ पॅटर्न’ यंदा यशस्वी होईलच, असाही सूर आहे.महायुतीचे शेळके आणि अपक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर लावण्याची आणि मिरवणुका काढण्याची तयारी सुरू केली आहे. प्रचारात दोन्ही उमेदवारांची आघाडी होती. यावेळेस मागीलवेळपेक्षा दीड टक्के मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे या मतदारांनी कोणाला कौल दिला हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

विकासकामे, गुंडगिरी यावर प्रचारात भर

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेळके आणि अपक्ष भेगडे यांच्यात लढत असताना दोघांनी प्रचारात एकमेकांवर टीका केली होती. शेळके पाच वर्षांतील विकासकामांचा दाखला देत पुन्हा आमदार होणार असल्याचे सांगत होते, तर भेगडे यांनी मतदारसंघातील गुंडगिरी, अर्धवट विकासकामे आदी मुद्दे मांडत प्रचार केला. त्यांना मावळातील सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याने लढतीत रंगत आली. मात्र, शहरी आणि मूळ भाजपच्या मतदारांचा कौल शेळके यांना, तर ग्रामीण मतदारांचा कौल भेगडे यांना असल्याचे चित्र आहे.

दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचेच

दोघे उमेदवार एकाच पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीत होते. ते जुने मित्रही आहेत. मात्र, एकमेकांवर प्रखर टीका करत त्यांनी वैयक्तिक उणीदुणीही काढली. त्याचबरोबर गावकी-भावकी, मावळातील गुंडगिरी, विकासकामे आदी मुद्दे प्रचारात प्रमुख होते. त्याचा प्रभाव मतदारांवर किती पडला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maval-acमावळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार