रविवारी २२९ कोरोनाबाधित, २७८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:15+5:302021-09-06T04:14:15+5:30
पुणे : शहरात रविवारी २२९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ रविवारी विविध तपासणी केंद्रांवर ७ ...

रविवारी २२९ कोरोनाबाधित, २७८ कोरोनामुक्त
पुणे : शहरात रविवारी २२९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ रविवारी विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९८७ संशयितांची तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.८६ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार २५८ इतकी आहे. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०८ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९० इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ८० हजार ४३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९६ हजार ७७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८५ हजार ५६५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९४९ जणांचा मृत्यू झाला आहे.