शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'सनबर्न'ने परवानगी घेताना केली दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 05:29 IST

सनबर्न या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून विरोध होत असून, बावधन, हिंजवडी पाठोपाठ आता लवळे गावचे ग्रामस्थ ही एकवटले आहेत. लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामसभा घेतली होती. त्यामध्ये सनबर्नच्या आयोजकांनी लवळे ग्रामपंचायतीची दिशाभूल करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. परंतु ते ना हरकत पत्र आम्ही रद्द केलेले आहे, अशी माहिती लवळे गावच्या सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली.

पिरंगुट : सनबर्न या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून विरोध होत असून, बावधन, हिंजवडी पाठोपाठ आता लवळे गावचे ग्रामस्थ ही एकवटले आहेत. लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामसभा घेतली होती. त्यामध्ये सनबर्नच्या आयोजकांनी लवळे ग्रामपंचायतीची दिशाभूल करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. परंतु ते ना हरकत पत्र आम्ही रद्द केलेले आहे, अशी माहिती लवळे गावच्या सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली.कंपनीने जरी बळजबरीने हा कार्यक्रम घेतल्यास आत्मदहनाचा व आंदोलनाचा इशारा ही ग्रामस्थांच्या वतीने या ग्रामसभेमध्ये देण्यात आला. त्यानुसार या ग्रामसभेमध्ये सनबर्न या कार्यक्रमाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या तयारीसाठी चालु असलेली सर्व कामे बंद पाडली.२८ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये लवळे (ता. मुळशी) येथील आॅक्सफोर्ड गोल्फ क्लब रिसॉर्ट येथे सनबर्ग हा कार्यक्रम होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या शहरात विरोध झाल्याने बावधन व लवळे गावच्या सीमेवर हा कार्यक्रम होत आहे. यासाठी मुंबई येथील मे. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लवळे ग्रामपंचायतीकडे दिनांक ४ डिसेंबर रोजी संगीतमय कार्यक्रम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ग्रामपंचायतीने मिळालेल्या अर्जानूसार संगीतमय कार्यक्रम आहे म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.यासंदर्भात सरपंच विद्या क्षीरसागर व उपसरपंच वैभव कुदळे यांनी सांगितले, की में. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेल्या अर्जात सनबर्न कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. केवळ संगीतमय कार्यक्रमासाठी परवानगी पाहिजे, असे लिहिले होते. त्यामुळे कंपनीने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याने प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे