शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 16:41 IST

पुण्यातील सेवा मित्र मंडळाच्या वतीने अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर घटविण्यात येणार अाहे. अनाथ मुलांना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार अाहेत. तसेच या मुलांसाठी विविध मनाेरंजनाचे कार्यक्रमही अायाेजित करण्यात येणार अाहेत.

पुणे : शाळांना सुट्ट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावाला जायची अाेढ लागते. मामाच्या गावाला जाऊन धमाल, मस्ती करण्याचा बेत अाखला जाताे. मात्र वंचित तसेच विशेष मुलांना या अानंदापासून वंचित रहावे लागते. अशाच अनाथ मुलांना मामाच्या गावाची सफर पुण्यातील सेवा मित्र मंडळ घडविणार अाहे. त्याचबराेबर दृष्टीहीन भगिनींचा विवाह साेहळ्याचे सुद्धा अायाेजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ यांनी दिली.     मामाच्या गावच्या सफरीची सुरूवात गुरुवार, दिनांक १९ एप्रिल रोजी दुपारी ४  वाजता होणार असून या दिवशी भाचे मंडळींचे स्वागत होणार आहे. हत्ती, उंट, घोडे, मिकी माऊस हे भाचे मंडळीच्या स्वागताला येणार आहेत. यासोबतच त्यांच्यासाठी इक्बाल दरबार यांचा गॉड गिफ्ट हा सांगितीक कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भाचे मंडळीना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे देखील दाखविण्यात येणार आहेत.     वैभव वाघ म्हणाले, शहरातील अनाथ आश्रमातील मुले-मुली मामाच्या गावच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आतुरतेने वाट पहातात. दोन ते तीन दिवस भाचे मंडळी मुक्कामी असतात. अनाथ आणि विशेष मुलांना मामाच्या गावी येऊन सुट्टीमध्ये मजा करता यावी यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. पुण्यातील श्रीवत्स, बचपन घर फोरम, संतुलन, एकलव्य न्यास. फुलवा, आपलं घर आदी संस्थातील मुले सहभागी होणार आहेत.     मंडळातर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन अंध भगिनींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यांना पुढील जीवनासाठी संसारोपयोगी साहित्याची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक संख्येने लोकांनी त्यांना मदत करावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेsocial workerसमाजसेवक