सुमित तापकीरची सुवर्णपदकाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:10 IST2021-03-06T04:10:14+5:302021-03-06T04:10:14+5:30
सुमित हा बाणेरचा असून तो भारती विद्यापीठामध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याचे वडील संजय हे शेतकरी असून आई सुनंदा या ...

सुमित तापकीरची सुवर्णपदकाला गवसणी
सुमित हा बाणेरचा असून तो भारती विद्यापीठामध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याचे वडील संजय हे शेतकरी असून आई सुनंदा या गृहिणी असून त्या कबड्डीपटू आहेत. सुमितला दोन भाऊ असून तेही खेळाडू आहेत. आईने दिलेल्या प्रोत्साहनामुळे प्रतिकुल परिस्थितीतही त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारती विद्यापीठाच्या संचालिका अस्मिता जगताप आणि राजेंद्र जगताप हे दोघे सुमितला खेळासाठी प्रोत्साहन देत आहेत. सुमितचा सराव प्रशिक्षक संजोग तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली यंगस्टर स्पोर्टस क्लब बाणेर येथे सुरू आहे. यापूर्वीही राष्ट्रीय आइस स्केटिंग स्पर्धेत अनेक पदके पटकाविली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जागतिक पर्सनल रेकॉर्ड ही बनवला आहे. एशियन स्पर्धेत रिलेमध्येसुद्धा त्याला रौप्यपदक मिळाले आहे.
------