नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता पुणे दौऱ्यावरून सुळे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:54+5:302020-11-29T04:05:54+5:30

तळेगाव दाभाडे : कोरोनाची लस ही पुण्यातच तयार झाली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आज तळेगावमध्ये ...

Sule's criticism from Pune tour without mentioning Narendra Modi's name | नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता पुणे दौऱ्यावरून सुळे यांची टीका

नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता पुणे दौऱ्यावरून सुळे यांची टीका

तळेगाव दाभाडे : कोरोनाची लस ही पुण्यातच तयार झाली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आज तळेगावमध्ये आले. आमदार यांच्या सौभाग्यवतींनी चांगला स्वयंपाक केला आणि मी म्हटले मीच केला, हे योग्य नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथे मी ऐकले १५०० कोटी, १६०० कोटींची विकासकामे होत आहेत. दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो. हे कोण बोलते ते तुम्हाला माहीत आहे. ते आज पुणे दौऱ्यावर आलेत. दुनिया घुम लो. पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे.

Web Title: Sule's criticism from Pune tour without mentioning Narendra Modi's name