मिझोराम गोळीबारात जखमी झालेल्या निंबाळकरांची सुळेंनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST2021-09-16T04:15:05+5:302021-09-16T04:15:05+5:30
देशातील सर्वांत तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी अशी ओळख निंबाळकर यांची आहे. त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले ...

मिझोराम गोळीबारात जखमी झालेल्या निंबाळकरांची सुळेंनी घेतली भेट
देशातील सर्वांत तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी अशी ओळख निंबाळकर यांची आहे. त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे. निंबाळकर यांनी उल्फा, के.पी.एल.टी., एन.डी.एफ.बी सारख्या अतिरेकी संघटनांविरुद्ध दहशतवादविरोधी कारवायांचे नेतृत्व केले आहे. याखेरीज 'कम्युनिटी पोलिसिंग'चे ते समर्थक असून जादूटोणा, अमली पदार्थ, व्यसनमुक्ती, सायबर क्राइम इत्यादी सामाजिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
नुकतेच त्यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी आसाम राज्याचे मुख्यमंत्री सबार्नंद सोनवाल यांनी सन्मानित केले. तसेच आसामच्या पोलीस महासंचालकांकडूनही सुवर्णपदक मिळाले आहे. याबद्दल खासदार सुळे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी वैभव यांच्या पत्नी अनुजा, वडील चंद्रकांत निंबाळकर, आई संगीताताई निंबाळकर, त्यांची बहीण व अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर, ‘स्टोरीटेल’चे पब्लिशिंग मॅनेजर व ऊर्मिला यांचे पती सुकिर्त गुमास्ते, अनुजा यांच्या आई शीतल गोरे आदी उपस्थित होते.
वैभव निंबाळकर यांची सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट घेतली.
१५०५२०२१ बारामती—०५