अवसरीत विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
By Admin | Updated: December 22, 2016 02:44 IST2016-12-22T02:44:01+5:302016-12-22T02:44:01+5:30
अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेऊन आज सकाळी

अवसरीत विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
मंचर : अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली आहे. स्वाती अनिल ढोबळे (वय १९, मूळ रा. पोण्डशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी - अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय इटीसीच्या दुसऱ्या वर्षात स्वाती अनिल ढोबळे शिकत होती. महाविद्यालय मुलींच्या वसतिगृहाच्या एका खोलीत दोन विद्यार्थिनीसह ढोबळे राहत होती. सकाळी ढोबळे हिच्या खोलीतील दोन विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्या होत्या.
खोलीतील पंख्याला दोरी बांधून टेबलवर खुर्ची ठेवून स्वाती ढोबळेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी हा प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा केला आहे.
आत्महत्येपूर्वी ढोबळेने एका मुलाचे फक्त नाव लिहून ठेवल्याने प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.