चाकण येथे वनविभागात कामगाराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: October 17, 2016 21:00 IST2016-10-17T21:00:04+5:302016-10-17T21:00:04+5:30
येथील कडाचीवाडी गावच्या वनविभागाच्या हद्दीत रोटाई ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.

चाकण येथे वनविभागात कामगाराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
चाकण : येथील कडाचीवाडी गावच्या वनविभागाच्या हद्दीत रोटाई ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली. हा बेवारस मृतदेह आज सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळला. त्याचे केस लांब असून अंगात निळा टी शर्ट व काळी पँट आहे. शर्टावर बीव्हीजी कंपनीचे नाव लिहिले असल्याने तो कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाल्याने हि घटना चार पाच दिवसापूर्वी घडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हवालदार अमोल बोराटे व किरण राऊत यांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविला आहे. हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत