बारामतीत दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: January 11, 2015 23:42 IST2015-01-11T23:42:36+5:302015-01-11T23:42:36+5:30
बारामती शहरात वसंतनगर येथे रविवारी (दि. ११) पहाटे एका तरुण दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.

बारामतीत दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
बारामती : बारामती शहरात वसंतनगर येथे रविवारी (दि. ११) पहाटे एका तरुण दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. पतीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून विवाहितेने रात्री गळफास घेतला होता. त्यानंतर पहाटे पत्नीने गळफास घेतल्याचे पाहून पतीनेदेखील गळफास घेतला. घटनेच्या वेळी या दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी घरातच होते.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा केशव रसाळ (वय २७) व केशव कल्याण रसाळ (वय ३५) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत. केशव हा सेंट्रींगची कामे तर पत्नी रेखा धुणे भांड्याचे काम करीत होते. वसंतनगर येथील शहाजी गायकवाड यांच्या खोल्यांमध्ये भाडेकरू म्हणून ते वास्तव्यास होते. दरम्यान, विवाहिता रेखा हिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये पती चारित्र्याचा संशय घेवून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत आहे. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे रेखा हिने गळफास घेतल्यानंतर घाबरून तिचा पती केशव याने रविवारी पहाटे आत्मह्त्या केली असावी. तसेच, रेखा हिने रात्रीच आत्महत्या केली असे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.