पित्याची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: May 13, 2017 04:28 IST2017-05-13T04:28:57+5:302017-05-13T04:28:57+5:30
मुलीचे लग्न अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना बारामती तालुक्यातील नारोळी येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) रात्री साडेनऊच्यादरम्यान घडली.

पित्याची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : मुलीचे लग्न अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना बारामती तालुक्यातील नारोळी येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) रात्री साडेनऊच्यादरम्यान घडली.
विजय माणिक कोंडे (वय ४२, रा. नारोळी, कोंडेवस्ती) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोंडे यांच्या मुलीचा लग्नसमारंभ येत्या बुधवारी (दि. १७) होता. घरामध्ये पाहुणे आलेले होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते घराच्या पाठीमागे गेले ते पुन्हा आलेच नाहीत. त्यामुळे कोंडे यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांनी घरापाठीमागील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याची खबर कोंडे यांचे सासरे मोहन बाबासोा ताकवणे यांनी पोलिसांना दिली. आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.