अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST2021-06-10T04:09:14+5:302021-06-10T04:09:14+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राठोड हे गवंडी काम करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास जेवायला घरी ...

Suicide by strangulation of a minor girl | अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राठोड हे गवंडी काम करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास जेवायला घरी असता त्यांना निकिता आढळून आली नाही. त्यांनी शेजारील खोलीत जाऊन पहिले तेव्हा ओढणीच्या साहाय्याने कपडे अडकविण्याच्या आकडीला अंकिता लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला नागरिकांच्या मदतीने खाली घेण्यात आले. तिने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला लोणी काळभोर परिसरातील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, गुन्हे शोधपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक भागवत शेंडगे यांनी भेट देऊन माहिती घेतली.

Web Title: Suicide by strangulation of a minor girl