सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:11+5:302021-07-14T04:14:11+5:30
रोहिणी रंजित सातपुते हिने असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई संगिता रमेश कांबळे (वय. ४५, रा. ...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
रोहिणी रंजित सातपुते हिने असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई संगिता रमेश कांबळे (वय. ४५, रा. मु. उकडगांव, पो. सांडवा, ता. जि अहमदनगर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून रोहिणीचा पती रंजित लहू सातपुते, सासू अलका लहू सातपुते व सासरे नामे लहू सखाराम सातपुते (तिघेही रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणीचा विवाह २०१० मध्ये रंजीत याच्याशी झाला होता. या दोघांना ९ वर्षाची एक मुलगी व एक मुलगा आहे. हे चौघेही कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे रहात होते.
लग्न झाल्यानंतर काही दिवस तिला व्यवस्थित नांदवण्यात आले. मात्र, त्यानंतर तिला अनेक कारणांवरून त्रास दिला जाऊ लागला. जुन २०२१ मध्ये आई आजारी असताना रोहिणी माहेरी गेली. त्यावेळी तिने मुलीचे नांवावर ठेवण्यासाठी ५० हजार रुपये व १ लाख रुपये जागा घेण्यासाठी आईकडून घेवून ये असे पतीने सांगितले. अशा अनेक कारणांवरुन तीचा वारंवार छळ होत असल्याने अखेर या त्रासाला कंटाळून तीने रविवारी (दि ११) तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली.