तरुणाची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By Admin | Updated: January 11, 2017 02:31 IST2017-01-11T02:31:16+5:302017-01-11T02:31:16+5:30

खडकीतील सिम्बायोसिस महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाने हडपसर येथील ठक्कर एन्क्लेव्ह या इमारतीच्या सहाव्या

Suicide by jumping from the sixth floor of the youth | तरुणाची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

तरुणाची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : खडकीतील सिम्बायोसिस महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाने हडपसर येथील ठक्कर एन्क्लेव्ह या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली़ ही घटना सोमवारी रात्री घडली़ त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
कन्व्हर हर्षवर्धन राघव (वय २२, सध्या सिम्बायोसिस वसतिगृह, मूळ रा. इंद्रप्रस्थनगर, रायपूर, छत्तीसगड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. क्न्वहर हा खडकीतील सिंबायोसिस महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे वडील हे लष्करामध्ये कर्नल पदावर आहेत. तसेच हडपसर येथे कर्नल ठाकूर हे ठक्कर एनल्क्लेव्ह इमारतीमध्ये राहण्यास आहेत. त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे सुटीनिमित्त तो त्यांच्याकडे राहण्यास आला होता. दरम्यान सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कन्व्हरने ठक्कर इनक्लेव्ह सोसायटीतील घराच्या सहाव्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली.

Web Title: Suicide by jumping from the sixth floor of the youth