ऊस वाहतूकदार आक्रमक
By Admin | Updated: August 6, 2015 03:45 IST2015-08-06T03:45:46+5:302015-08-06T03:45:46+5:30
साखर कारखानदारीवरील विघ्न संपण्याचे काही नाव घेत नाही. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ट्रक व ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार आता आक्रमक

ऊस वाहतूकदार आक्रमक
सोमेश्वरनगर : साखर कारखानदारीवरील विघ्न संपण्याचे काही नाव घेत नाही. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ट्रक व ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार आता आक्रमक झाले असून, जोपर्यंत आमचे गेल्या हंगामातील कमिशन व डिपॉझिट मिळत नाही, तोपर्यंत कारखान्याबरोबर एकही करार करणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
येथील सोमेश्वर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना आता सन २०१४—१५ हंगामातील कमिशन व डिपॉझिट तसेच बँकेचे कर्जमुक्तीचे दाखले द्या; अन्यथा येणाऱ्या हंगामासाठी एकाही वाहनाचा करार करणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
येणाऱ्या हंगामातील करारासाठी वाहनांना उचल न देता २५ हजार रुपये डिपॉझिट देण्याची अट आम्हाला मान्य नसल्याचे संघटनेने सांगितले आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मीटिंगमध्ये ३०० ते ३५० ट्रक व ट्रॅक्टर वाहनमालक उपस्थित होते. या वेळी बाळासाहेब परकाळे उपस्थित होते.
कारखाना प्रशासनाच्या वतीने शेतकी अधिकारी सोमेनाथ
बेलपत्रे यांनी ३५० सह्यांचे निवेदन स्वीकारले. संघटनेने कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
आमचे ट्रक व ट्रॅक्टर मालकांचे कारखान्याकडे असलेले कमिशन व डिपॉझिट दोन दिवसांत द्यावे. तसेच हंगाम २०१३-१४ व १४-१५ या काळातील आम्ही कारखान्याकडून घेतलेले कर्ज फेडले असतानाही
बँकेत आमच्या नावे कर्ज दिसत आहे. त्याचा कर्ज बाकी नसल्याचा दाखला मिळावा.
आमच्या नावे कर्ज दिसत असल्याने इतर कोणत्याही बँका आम्हाला कर्ज देण्यास धजावत नाहीत तरी वरील सर्व दोन दिवसांत द्यावे; अन्यथा एकही ट्रक व ट्रॅक्टरमालक येणाऱ्या हंगामात कारखान्याशी करार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)