साखर दरवाढीमुळे गाठीच्या किमती वाढल्या
By Admin | Updated: April 4, 2016 01:28 IST2016-04-04T01:28:27+5:302016-04-04T01:28:27+5:30
चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारात साखरगाठी विक्रीला उपलब्ध आहे़ साखरेचे दर वाढल्याने गाठीचे दरदेखील तुलनेने वाढले आहेत

साखर दरवाढीमुळे गाठीच्या किमती वाढल्या
बारामती : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारात साखरगाठी विक्रीला उपलब्ध आहे़ साखरेचे दर वाढल्याने गाठीचे दरदेखील तुलनेने वाढले आहेत. ऐन दुष्काळात भाव वाढल्याने नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.
बाजरात विविध रंगाच्या गाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, गुलाबी आदी रंगांबरोबरच साध्या पांढऱ्या रंगाच्या गाठी उपलब्ध आहेत. विशेषत पांढऱ्या रंगाच्या गाठीला ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने गाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे. गतवर्षी हाच दर ७० ते ८० रुपये दर होता. साखरेचे दर देखील यंदा वाढलेले आहेत, त्यामुळे गाठीचे दर काही प्रमाणात आहेत. तर होलसेलचा प्रतिकिलो ५२ रुपये असणारा दर यंंदा ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर आल्याने बाजारात गाठी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तर दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवर दिसत असल्याने काही ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गतवर्षीच्या तुलनेने साखरेचे दर चांगलेच भडकले आहेत. शिवाय मजुरी, इंधन, पाणी अधिक महाग झाले आहे. मात्र, केवळ बाजारावर दुष्काळाचे सावट असल्याने गाठीचे अधिक दर वाढविणे व्यापारीवर्गाने टाळले आहे. गुढीबरोबर गाठी कलशाला बांधली जाते. शिवाय लहान मुलांच्या गळ्यात गाठी बांधली जाते.