साखर कारखानदारीला मदत करणार
By Admin | Updated: May 25, 2015 23:11 IST2015-05-25T23:11:10+5:302015-05-25T23:11:10+5:30
सध्या अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांना दिले.

साखर कारखानदारीला मदत करणार
केडगाव : सध्या अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांना दिले. नुकत्याच झालेल्या भीमा पाटस निवडणुकीत राहुल कुल यांच्या जनसेवा पॅनलने २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयात आमदार राहुल कुल यांचा सत्कार करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर कुल यांनी साखर कारखानदारीच्या समस्या बापट यांना सांगितल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेच्या ढासळलेल्या किंमती, ऊस व साखर यांच्या बाजारभावामध्ये कमी झालेली तफावत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे बाजारभाव देणे सहकारी साखर कारखान्याला चालू वर्षी अडचणीचे होत असल्याचे कुल यांनी बापट यांच्या निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याला पॅकेज स्वरुपात, कर्जस्वरुपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बापट यांनी सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक नामदेव बारवकर, अप्पासाहेब हंडाळ, माऊली ताकवणे, निळकंठ शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)