शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

खडकवासल्यासह इतर धरणांमध्ये पुण्याला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:19 IST

खडकवासला,टेमघर ,पानशेत व वरसगाव या धरणांमध्ये शनिवारी सकाळी १४.२५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यात १४.७३ टीएमसीपर्यंत वाढ झाली.

ठळक मुद्दे१५ जुलैपर्यंतच १५ टीएमसी : खडकवासला ८१ टक्के तर ; पानशेत ६५ टक्के भरले

पुणे: गेल्या दोन आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाण्यात सुमारे १५ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी खडकवासला धरण ८१.४३ टक्के भरले असून पानशेत धरण ६५.८९ टक्के भरले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणसाखळीतील धरणांमध्ये १४.७३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पुण्याची पाण्याची वर्षभराची गरज १४ टीएमसी आहे. पुणे जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतीला आणि पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या दहा दिवसांहून अधिक कालावधीपासून मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे सुमारे १० ते १२ तासात धरणांमध्ये अर्धा टीएमसीपर्यंत पाणीसाठा वाढत आहे.खडकवासला,टेमघर ,पानशेत व वरसगाव या धरणांमध्ये शनिवारी सकाळी १४.२५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यात १४.७३ टीएमसीपर्यंत वाढ झाली. जून महिना उलटून गेला तरी पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. परिणामी पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला १५आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे,असे सिंचन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात होते. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखळीत १जुलै रोजी केवळ ३.४८ टीएमसी पाणीसाठा होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धरणसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊ लागली. १४ जुलै रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत धरणसाठ्यात १४.२५ टीएमसीपर्यंत वाढ झाली.त्यामुळे गेल्या १४ दिवसांत धरणसाठ्यात १०.७७ टीएमसीपर्यंत वाढ झाली.दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरण ८१.४३ टक्के,वरसगाव धरण ३६.४९ टक्के,पानशेत धरण ६५.८९ टक्के तर टेमघर धरण ३८.४४  टक्के भरले आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी धरणक्षेत्रात ४० ते ६० मि.मी.पाऊस होत होता. मात्र,गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून धरण क्षेत्रात  ५ ते २५ मि.मी.पर्यंत पाऊस कमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात १.६० टीएमसी,पानशेत धरणात ७.०२ टीएमसी,वरसगाव धरणात ४.६८ टीएमसी तर टेमघरमध्ये १.४३ टीएमसी एवढा पाणीसाठा होता,असे सिंचन भवनातील अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊस