अवकाळी पावसाने शहराला झोडपले

By Admin | Updated: December 13, 2014 00:45 IST2014-12-13T00:45:50+5:302014-12-13T00:45:50+5:30

ढगांच्या गडगडाटांसह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने शुक्रवारी संपूर्ण शहराला झोडपून काढले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती.

Suddenly rain rained the city | अवकाळी पावसाने शहराला झोडपले

अवकाळी पावसाने शहराला झोडपले

पुणो : ढगांच्या गडगडाटांसह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने शुक्रवारी संपूर्ण शहराला झोडपून काढले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. अचानक आलेल्या पावसाने पुणोकरांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्री उशिरार्पयत पाऊस सुरूच होता.
हुडहुडी भरविणा:या थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणोकरांना शुक्रवारी जोरदार पावसाला सामोरे जावे लागले. हवामानातील बदलांमुळे राज्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी काही भागात अवकाळी पाऊस पडला. शुक्रवारी या पावसाने शहराला झोडपून काढले. गुरुवारपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची वाढ झाली होती. शुक्रवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी दीडच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा होता, की 1क् ते 15 मिनिटांतच रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावर उथळ भागात 
पाणी साचले. (प्रतिनिधी)
 
34.5 मिमी पाऊस
हवामान खात्याकडे रात्री साडेआठ वाजेर्पयत 34.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावरून दिवसभरात झालेल्या पावसाचा जोर स्पष्ट होतो. लोहगाव येथे 8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात मेघगजर्नेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आणखी दोन दिवस पावसाळी वातावरणातच काढावे लागण्याची शक्यता आहे.
 
भोसरी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस
भोसरी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे वाहने चालविणोही अशक्य झाले होते.  पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. रात्री अकरार्पयत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता.भोसरी, 
चाकण परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 

Web Title: Suddenly rain rained the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.