शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापूर येथे रेफ्रिजरेटरचा अचानक स्फोट; दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 12:19 IST

पाणीपुरी विक्रेत्याच्या राहत्या घरात वापरत असलेल्या फ्रिजचा अचानक स्फोट झाला.

शिक्रापूर : वाजेवाडी (ता. शिरूर) येथील चौफुला चौकात गुुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका पाणीपुरी विक्रेतेच्या राहत्या घरात  रेफ्रिजरेटरचा अचानक स्फोट झाल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.

चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील वाजेवाडी हद्दीत चौफुला चौकात असलेल्या योगेश खंडू शेळके यांच्या इमारतीत भाडेकरू रमेश चंद्र आहेर हा पाणीपुरी विक्रेता वास्तव्यास होता. त्याच्या खोलीत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या खोलीलगत रस्त्याच्या बाजूने असलेल्या नव्याने सुरू केलेल्या चप्पल आणि कपड्याच्या दुकानातून स्फोट बाहेर निघाला. मात्र या दुकानात असलेला दुकान मालक अमित मोहन तिखे (वय २५ ) आणि त्याचा मित्र शंकर उर्फ बंटी सुरेश साबळे (वय २३) हे दोघेही स्फोटात  दुकानाच्या बाहेर फेकले गेले. त्यात भाजल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की दुकानाच्या दरवाजा आणि काचा चारशे ते पाचशे फूट लांब रस्त्यावर उडून पडल्या.स्फोटाचा आवाज मोठा झाल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. मात्र दादा वाजे या युवकाने तात्काळ धावून येत रुग्णवाहिकेची वाट न बघता गंभीर जखमी झालेल्या दोन्ही युवकांना स्वतःच्या कारने शिक्रापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान ही घटना शिक्रापूर पोलिसांना समजताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर, उपनिरीक्षक राजेश माळी, हवालदार प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

परिसरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याची अफवा पसरली होती. मात्र पोलिसांनी पाहणी केल्यानंतर  रेफ्रिजरेटरच्या आतील गॅसचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPoliceपोलिसAccidentअपघात