शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

जेव्हा..तोरणागडावर फडकवतात ‘ती’ नजरेपलिकडची पावले भगवा ध्वज.. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:03 IST

अतिदुर्गम तोरणा किल्ला जर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुणी असामान्य तरुणांची पलटन सर करत असेल तर ती आश्चर्य व साहसाचे आगळेवेगळे उदाहरण नक्कीच ठरु शकते नां..

ठळक मुद्देसातारा, मुंबई, पनवेल, ठाणे आदी भागातून हे अंध युवक या अवघड ट्रेकसाठी एकत्र या मोहिमेत २५ तरुण तर १५ तरुणी असे ४० अंध दिव्यांग युवक सहभागी

वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण असणारा व चढाईसाठी प्रचंड अवघड असणारा असा हा अतिदुर्गम तोरणा किल्ला. तोरणा किल्ला सर करताना भल्या भल्यांची चांगलीच भंबेरी उडते. मग हा किल्ला जर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुणी असामान्य तरुणांची पलटन सर करत असेल तर ती आश्चर्य व साहसाचे आगळेवेगळे उदाहरण नक्कीच ठरु शकते नां.. असाच अविस्मरणीय अनुभवाने तोरणागडावर ती नजरेपलिकडची पावले जेव्हा पडली तेव्हा झाला आत्मविश्वास आणि जल्लोष... ही साहसी कथी आहे..मुंबई, ठाणे, पनवेल,सातारा भागातून एकत्र येत आलेल्या दिव्यांग (दृष्टीहीन ) युवकांची... मुंबई येथील जिजाऊ प्रतिष्ठान च्या स्वयंसेवकांनी या अंध युवकांसाठी एक अनोखा ट्रेक आयोजित करून सृष्टी पाहू शकत नसलेल्यांना तोरणा गडावर नेऊन आनंद, निसर्ग, मेहनत, साहस अशा वैैविध्यपूर्ण छटांसह तोरणाच्या ऐतिहासिक भव्यतेचा अनुभव दिला. यामध्ये मोहिमेत २५ तरुण तर १५ तरुणी असे  ४० अंध तरुण तरुणीं सहभागी झाले होते. या दिव्यांग युवक युवतींनीनिर्विघ्नपणे तोरणा गड सर करत सर्वांना आश्चयार्चा धक्का  दिला आहे. मुंबई येथील जिजाऊ प्रतिष्ठान व नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइन्ड इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदर ट्रेक चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७५ ते १०० टक्के अंध युवक व युवती सहभागी झाले होते. सातारा, मुंबई, पनवेल, ठाणे आदी भागातून हे अंध युवक या अवघड ट्रेकसाठी एकत्र आले. मुसळधार पाउस..अतिदुर्गम तोरणागडाची कड्याकपारीतून जाणारी गडाची निसरडी पाऊलवाट..उंच कडे यामधून मार्ग काढत दुर्दम्य आकांक्षा बाळगणाऱ्या या अंध युवकांनी तोरणा किल्ला सर करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या दरम्यान प्रतिष्ठान चे चंद्रकांत सातम यांनी या विद्यार्थ्यांना गडावरील झुंजार माची, बुधलामाची, कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, मेंगाई टाके, आदी ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. डोळ्यांना दिसत नसतानाही या युवकांनी आपल्या ज्ञानचक्षुमधून तोरणा गड अनुभवला. वेल्ह्यातील गोटू गाडे यांनी सर्वांचे स्वागत केले.   जिजाऊ प्रतिष्ठान मुंबई येथील विनायक वैद्य, गणेश रघुवीर, सुरेश देवकर, हेमंत पाठक, विवेक देशपांडे, स्वप्नाली वाळके, आदी स्वयंसेवकांनी यासाठी प्रत्यक्ष मदत केली...............................अंध डोळ्यांनी अनुभवला तोरणागड   डोळ्यांनी अंध असतानाही १६०० फूट उंचीवर जाऊन तोरणा गडाच्या भव्यतेचा यांनी अनुभव घेतला. दृष्टी नसताना स्पर्श आणि आंतर्दृष्टीतून या अंंध युवक युवतींनी गड अनुभवला. मुसळधार पावसातही निसरड्या रस्त्याने किल्ला यशस्वीपणे सर केला. गडाच्या पायथ्याशी आल्यावर तोरणागडाची प्रतिकृती दाखवली.  कस्तुरी अंदर, श्वेता आगरवाल, निशा डिसुझा, सरिता पाटील, शनया लोखंडे, समिक्षा पाटील, ह्रुशी पाडळे, पियुष रानडे, रुद्र ढोकळे, प्रसाद वायाळ, देवेन सोनार, आदी युवक- युवतींनी यामधे सहभाग घेतला. जिजाऊ प्रतिष्ठान मुंबई येथील विनायक वैद्य, गणेश रघुवीर, सुरेश देवकर, हेमंत पाठक, विवेक देशपांडे, स्वप्नाली वाळके, आदी स्वयंसेवकांनी यासाठी प्रत्यक्ष मदत केली...........................मी १०० टक्के डोळ्याने अंध आहे. तरीही गड किल्य्यांची माळा आवड आहे. आज तोरणा सर करताना मोठे स्फुरण चढले होते. महाराष्ट्रातील हा अतिदुर्गम व धोकादायक किला असतानाही आम्ही यशस्वीपण ट्रेक पूर्ण केला आहे. आम्हाला किल्ला चढताना दुर्ग प्रेमी संस्थेच्या उमेश झिरपे यांच्या सहकार्यांनी मदत केली.                                - सागर बोबडे. मुंबई......................  समाजातील एक दृष्टिहीन आणि उपेक्षित असणाऱ्या  अंध व्यक्तीना सृष्टीचे ज्ञान देण्यासाठी आणि स्वराज्यातील गड कोतांची माहिती मिळावी यासाठी आम्ही दरवर्षी अंध युवकांना गाड्भ्रमंती करतो. आमचे हे ९ वे वर्ष आहे, तोरणा सर करणे एक  मोठे आव्हान होते परंतु या दिव्यांग  तरुणांनी धडधाकट तरुणानाही मागे सरत तोरणा गड यशस्वीपणे सर केला आहे. चंद्रकांत साटम - मुंबई. ....................................     

  

टॅग्स :Fortगडhistoryइतिहास