आळेफाटामध्ये जिभेवरील शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST2021-08-18T04:16:32+5:302021-08-18T04:16:32+5:30
डॉ. अमोल डुंबरे म्हणाले, की जिभेवरील कॅन्सर असलेला एक रुग्ण तपासणीसाठी हाॅस्पिटलमध्ये आला होता. तपासणी करताना जिभेवर व ...

आळेफाटामध्ये जिभेवरील शस्त्रक्रिया यशस्वी
डॉ. अमोल डुंबरे म्हणाले, की जिभेवरील कॅन्सर असलेला एक रुग्ण तपासणीसाठी हाॅस्पिटलमध्ये आला होता.
तपासणी करताना जिभेवर व मानेवर गाठी होत्या. अशा रुग्णाच्या जिभेचे पुनर्निर्माण करणे आवश्यक असते, तरच रुग्ण ब़ोलू शकतो, अन्नपाणी गिळू शकतो. नातेवाइकांनी परवानगी दिली होती. ही फार गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती.
यासाठी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अमोल डुंबरे, सहायक डॉ. अजित मुळे, डॉ. विशाल कुर्हाडे, भूलतज्ञ डॉ. विजेता शिंदे यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रिया करताना जिभेवरील व मानेवरील कॅन्सरच्या गाठी काढून टाकण्यात आल्या. यासाठी हातावरील त्वचा वापरून जिभेचे पुनर्निर्माण करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली या रुग्णाला आठ दिवसांनंतर घरी सोडले.
भारतात तोंडाच्या कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. तंबाखू, अल्कोहोल या व्यसनामुळे कॅन्सर ह़ोतो. दरवर्षी सुमारे ५५ हजार रुग्ण त़ोंडाच्या कॅन्सरने मृत्यू पावतात, तेव्हा या व्यसनापासून दूर रहा, असे आवाहन डॉ. अमोल डुंबरे यांनी केले आहे.
डॉ. अमोल डुंबरे