हिवरेत एक एकरात गाजराचे यशस्वी उत्पादन
By Admin | Updated: June 12, 2014 05:20 IST2014-06-12T05:20:45+5:302014-06-12T05:20:45+5:30
ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी संदिप लिंभोर यांनी आपल्या एक एकर शेतात गाजराच्या वाणाचे १५ टन उत्पन्न घेऊन सव्वा तीन महिन्यात यात १ लाख ६० हजारांचे उत्पन्न घेतले.

हिवरेत एक एकरात गाजराचे यशस्वी उत्पादन
नारायणपूर : हिवरे नारायणपूर - हिवरे (ता. पुरंदर) येथील गावचे ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी संदिप लिंभोर यांनी आपल्या एक एकर शेतात गाजराच्या वाणाचे १५ टन उत्पन्न घेऊन सव्वा तीन महिन्यात यात १ लाख ६० हजारांचे उत्पन्न घेतले.
संदिप लिंभोर यांनी सुरुवातीला शेतात नांगरट करुन भुमीलाभ या सेंद्रीय खत तसेच रासायणीक खत दिले. त्या नंतर गाजराचे बियाणे टाकले. त्यानंतर स-या काढुन घेतल्या. गाजराचे पिक मोठे झाल्यावर यावर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये
यासाठी सायपर गार्डची किटनाशकाची फवारणी केली. त्यानंतर बुरशी नाशकाच्या दोन फवारण्या केल्या. गाजराच्या वाणाचा रंग लालसर केसरी आकर्षक रंग असुन याला चांगल्या पध्दतीची चकाकी आहे. तसेच लांब व चवीस चांगला असल्यामुळे या वाणाला बाजारात चांगली मागणी आहे.
एका एकरात साघारण २०० पोती उत्पन्न झाले. एका पोत्यात साघारण ७५ ते ८० किलो माल बसतो.
या पध्दतीने साधारण १५ टन माल या शेतात मिळाला असून ११० रुपये १० किलो भाव
याप्रमाणे १ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. हा माल पुणे मार्केट येथे तसेच इतर ठिकाणी बाजारपेठ मिळाली.(वार्ताहर)