फॅशन शो मध्ये सई व सावीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST2021-08-15T04:14:43+5:302021-08-15T04:14:43+5:30

पुण्यातील एका आलिशान हॅाटेलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये किड्स गटामध्ये राज्यभरातील २५ पेक्षा अधिक चिमुकल्यांनी सहभाग ...

Success of Sai and Savi in fashion show | फॅशन शो मध्ये सई व सावीचे यश

फॅशन शो मध्ये सई व सावीचे यश

पुण्यातील एका आलिशान हॅाटेलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये किड्स गटामध्ये राज्यभरातील २५ पेक्षा अधिक चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला, टीन एजर्स गटामध्ये २३, मिस महाराष्ट्रमध्ये २९ जणांनी तर मिसेस महाराष्ट्र व मिश्टर महाराष्ट्रमध्ये अनुक्रमे १२ व ९ जणांनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेसाठी मिस एशीया ठरलेल्या डॉ. देशाई आणि डॉ. सारिका यांनी परिक्षण केले. सई आणि सावी या दोघीही पुण्यातील पोलिस काॅन्स्टेबल सागर गंगावणे यांच्या मुली आहेत. पोलिसाच्या अतिशय व्यस्त ड्युटीमधूनही मुलींना फॅशन जगतात यश मिळविण्यासाठी त्यांच्या सुरू असलेल्या धडपडीचे पोलीस दलातही कौतुक होत आहे.

फोटो क्रमांक : १४ पुणे फॅशन शो सुयश

फोटो क्रमांक : सई आणि सावी गंगावणे यांच्या समवेत फॅशन शोच्या विजयी स्पर्धक

Web Title: Success of Sai and Savi in fashion show