शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात यश

By admin | Updated: August 13, 2016 05:17 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात

पुणे : कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. ५५६ इतका पट वाढविण्यात आला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे व शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढणारी पुणे जिल्हा परिषद ही पहिलीच असल्याचा दावाही या वेळी त्यांनी केला. आज झालेल्या स्थायी समिती बैैठकीत पटसंख्या वाढल्याने उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व अर्थ समिती आणि शिक्षण विभागाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील गळती रोखणे हे आमचे स्वप्न होते. ज्या वेळी ही गळती रोखू तेव्हाच आमची कारकीर्द यशस्वी होईल, असे वक्तव्य कंद व वांजळे यांनी वारंवार केले होते. गेल्या वर्षी २९0 वर आलेली गळती या वर्षी शून्य होईल, असा ठाम विश्वास त्यांना होता. मात्र, जूनअखेरपर्यंत ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून पुन्हा २ हजार ९१७ ने विद्यार्थी गळती वाढल्याचे समोर आले होते. मात्र ३0 जुलैअखेरपर्र्यत मिळालेल्या आकडेवारीवरून ५५६ ने पट वाढल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक शिरूर तालुक्यात १ हजार १0२ व हवेली तालुक्यात १ हजार ४६ इतका पट वाढला आहे. त्याखालोखाल मुळशी ६२२, खेड ३८९ व पुरंदरला ५४ इतके विद्यार्थी वाढले आहेत. मात्र, बारामती ८४३, जुन्नर ५५३, इंदापूर ४0९, वेल्हा २५५, आंबेगाव १९१, मावळ १२१ इतकी मोठी विद्यार्थी गळती येथे कायम आहे. २0१२-१३ या वर्षांत जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या २ लाख ४६ हजार ७६५ इतकी होती. २0१३-१४ मध्ये ती २ लाख ३९ हजार ५३0 इतकी होऊन ७ हजार २३५ इतकी विद्यार्थी गळती झाली होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३ लाख ३४ हजार ५६0 इतकी होऊन गळती ४ हजार ९३४ पर्यंत आली होती. गेल्या वर्षी २0१५-१६ मध्ये यात लक्षणीय बदल होऊन पटसंख्या रोखून धरण्यात यश आले होते. फक्त ३२६ इतकी गळती झाली होती. ती प्लसमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते. याला यश आले असून, गेल्या वर्षी २ लाख ३४ हजार २७0 इतका असलेला पट या वर्षी ३0 जुलैपर्यंत २ लाख ३४ हजार ८२६ इतका झाला असून, पहिल्यांदाच पट ५५६ ने वाढला आहे. शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाने विद्यार्थी पालकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात ‘गुढीपाडवा व पट वाढवा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. पटसंख्या नोंदीचा जिल्हा परिषदेने सप्ताह राबवून घरोघरी जाऊन तुमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, असे सांगितले होते. विशेष म्हणजे या वेळी जिल्हा परिषद शाळा भौतिक सुधारणांबरोबर आयएसओ दर्जाच्या होत असून, ई-लर्निंग, कृतियुक्त अध्ययन पद्धती, संगणकीकृत शाळा आदी विविध उपक्रम सुरू आहेत. (प्रतिनिधी)शिक्षकांना स्वयंप्रेरणेने कामाचे स्वातंत्र्यप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम प्रभावीपणे राबविला गेला. शिक्षकांना वारंवार प्रशिक्षण देण्यात आले. ज्ञानरचनावादाचे धडे देण्याबरोबरच शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली. शाळेतील प्रत्येक मूल शिकेल, यावर भर देण्यात येत आहे. सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू केल्या. तसेच केलेले काम पालकांपर्यंत पोहोचवून जिल्हा परिषद शाळांत आपला पाल्य का शिकला पाहिजे, हे घरोघरी जाऊन पटवून दिल्याने या वर्षी विद्यार्थिसंख्या वाढल्याचे हवेलीच्या गटशिक्षण अधिकारी ज्योती परिहार यांनी सांगितले.हा आमच्यासाठी व जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. सतत पटसंख्या कमी होण्याची प्रथा मोडण्यात यश आले आहे. आमच्या शिक्षकांनी चांगले काम करून जनतेचा विश्वास मिळवल्याने पट वाढविण्यात यश मिळाले. पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल करावे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आम्ही देतो.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषदमाझं स्वप्न पूर्ण झालं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी सभापतिपदाचा पदभार घेतला, त्या वेळी विद्यार्थी गळती हे रोखणे हे माझे मोठे आव्हान होते. शाळांचा भौतिक दर्जा सुधारण्याबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर होता. तसेच ज्ञानरचनावादाचे धडे देण्याबरोबर खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळांतही मिळू शकते, हा विश्वास आमचे शिक्षक पालकांमध्ये निर्माण करू शकल्याने हे यश मिळाले.- शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष (शिक्षण समिती सभापती)गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर शिरूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील ८३७ मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये घेऊन येण्यास आम्ही यशस्वी झालो असून महामार्गावर औद्यागिक पट्ट्यातील कामगारांची मुलंही जिल्हा परिषदेतील शाळेत दाखल झाल्याने या वर्षी पटसंख्या वाढण्यात आम्हाला यश मिळाले आहे़- अर्जुन मिसाळ, गटशिक्षण अधिकारी, शिरूर