आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत खराडीच्या अल्ट्रा स्मार्ट अ‍ॅबॅकस संस्थेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:47+5:302021-02-05T05:20:47+5:30

चंदननगर : स्मार्ट किड्स अ‍ॅबॅकस लर्निंगच्या वतीने घेतलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आणि दहाव्या राष्ट्रीय अ‍ॅबॅकसच्या स्पर्धेमध्ये खराडीतील अल्ट्रा स्मार्ट अ‍ॅबॅकस ...

Success to Kharadi's Ultra Smart Abacus in International Abacus Competition | आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत खराडीच्या अल्ट्रा स्मार्ट अ‍ॅबॅकस संस्थेला यश

आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत खराडीच्या अल्ट्रा स्मार्ट अ‍ॅबॅकस संस्थेला यश

चंदननगर : स्मार्ट किड्स अ‍ॅबॅकस लर्निंगच्या वतीने घेतलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आणि दहाव्या राष्ट्रीय अ‍ॅबॅकसच्या स्पर्धेमध्ये खराडीतील अल्ट्रा स्मार्ट अ‍ॅबॅकस ने खूप मोठे यश संपादन केले आहे.

विविध श्रेणीमध्ये खेळविलेल्या या स्पर्धेत संस्थेतील मुलांनी घवघवीत असे यश मिळविले. या स्पर्धेत ऊ श्रेणीमध्ये श्रावणी जगताप हिने प्रथम क्रमांक पटकावला. उ-४ या श्रेणीमध्ये प्रणाली वडघुले हिने तर उ-३ मध्ये तन्मय अफरांदे याने प्रथम क्रमांक मिळविला. इ श्रेणीमध्ये अनुश्री पाटील हिने दुसरा क्रमांक व अद्वेत मुळे याने पाचवा क्रमांक पटकावला. तसेच अ श्रेणीमध्ये अभिराज केदारी याने चौथा क्रमांक मिळविला.

नगरसेवक महेंद्र पठारे यांनी या सर्व गुणवंत व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. पठारे म्हणाले, की विविध स्पर्धेत सहभागी होऊन असेच यश संपादन करावे व आपल्या भागाचे व संस्थेचे नाव रोशन करावे.

सन २०२० चा सर्वोत्कृष्ट संचालिका म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविलेल्या अल्ट्रा स्मार्ट अ‍ॅबॅकसच्या संचालिका जयश्री तोंडे व शिक्षिका नीलम भवर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.

फोटो ओळ : आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना नगरसेवक महेंद्र पठारे व शिक्षक वर्ग.

Web Title: Success to Kharadi's Ultra Smart Abacus in International Abacus Competition