एमआयटीच्या विद्यार्थींनीचे डिझाईनिंगमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST2020-11-26T04:26:37+5:302020-11-26T04:26:37+5:30
पुणे : इंडी डिझाईन यांच्यातर्फे ऑनलाईन पध्दतीने आयोजित केलेल्या ‘इंडिया डिझाईन शो २०२०’ मध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि ...

एमआयटीच्या विद्यार्थींनीचे डिझाईनिंगमध्ये यश
पुणे : इंडी डिझाईन यांच्यातर्फे ऑनलाईन पध्दतीने आयोजित केलेल्या ‘इंडिया डिझाईन शो २०२०’ मध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेकनॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थींनी प्रोडक्ट निर्मिती प्रकारात ‘ब्लेंडर-प्रो १०००’ या डिझाईनसाठीचा ‘इंडियाज बेस्ट डिझाइन अवॉर्ड २०२०’ जिंकले आहे.एमआयटीच्या निष्ठा धनानी, शर्वरी तांबट आणि शीतल नारखेडे यांनी हा पुरस्कार पटकावला. त्यांना प्रा. राहुल नायर यांनी मार्गदर्शन केले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. मंगेश कराड, एमआयटी इस्टीट्युट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. अनंत चक्रदेव, डिझाईन सेंटरचे संचालक प्रा. धीम्मंत पांचाळ, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यापीठाचे व्यवस्थापक प्रा. सूराज भोयर आणि प्रॉडक्ट डिझाईन विभागाचे प्रमुख प्रा. हरी कारा यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.