शहरातील कचरा जिरविण्यात यश
By Admin | Updated: January 19, 2015 01:47 IST2015-01-19T01:47:20+5:302015-01-19T01:47:20+5:30
उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये महापालिका प्रशासनाकडून अद्याप तिथे कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही.

शहरातील कचरा जिरविण्यात यश
पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये महापालिका प्रशासनाकडून अद्याप तिथे कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. तरीही शहरातील ६० ते ६५ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात प्रशासनाला यश आले आहे, उर्वरित ओला कचरा शेतकऱ्यांना खतासाठी दिला जात आहे. कचरा प्रश कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेकडून जास्तीतजास्त प्रयत्न केले जात असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आणखी ९ महिने कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे. मात्र प्रशासनाने साचलेला कचरा लगेच तिथे नेऊन न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा जिरविण्याच्या पर्यायी मार्गांचा अवलंब केला जात आहे. एकूण ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश आल्यानंतरच कचरा डेपोमध्ये कचरा टाकला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या ९ महिन्यांत कचऱ्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. (प्रतिनिधी)