एनएमएमएस परीक्षेत चैतन्य विद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:57+5:302021-08-28T04:14:57+5:30

याबाबत माहिती देताना स्पर्धा परीक्षा प्रमुख भाऊसाहेब खाडे म्हणाले, दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी ...

Success of Chaitanya Vidyalaya in NMMS examination | एनएमएमएस परीक्षेत चैतन्य विद्यालयाचे यश

एनएमएमएस परीक्षेत चैतन्य विद्यालयाचे यश

याबाबत माहिती देताना स्पर्धा परीक्षा प्रमुख भाऊसाहेब खाडे म्हणाले, दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी इयत्ता आठवीचे विद्यार्थी परीक्षेस बसतात. महाराष्ट्र राज्याकरिता जवळजवळ ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पाल्यांना या परीक्षेस बसता येते. यावर्षी चैतन्य विद्यालयातील १३ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. यश काफरे, पूजा सूर्यवंशी, सानिका वळे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची नावे आहेत.

विभागप्रमुख बी. आर. खाडे, एम. एम. तांबे, बी. डी. घोडके, पी. एम. जाधव, व्ही. जी. देशमुख, ए. ए. डांगे, डी. जी. नेहे, आर. बी. भालेकर यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर काका तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ शेठ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापक डी. व्ही. पानसरे, बी. व्ही डुंबरे, नढे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Success of Chaitanya Vidyalaya in NMMS examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.