शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून मिळवले यश;जुन्नर मधील शेतकऱ्याचा मुलगा झाला आधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:48 IST

ऋषिकेश मांडे याचा सर्व प्रवास सर्वाना प्रेरणा देणारा आहे . अनेक चढउतार या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आले. मात्र त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही . अनेकदा अपयश आल तेही पचवून घेतले .

नारायणगाव : अनेकदा अपयशाला गवसणी घालत, कॉर्पोरेट मध्ये जॉब करत जुन्नर तालुक्यातील येडगाव (गणेशनगर) येथील शेतकऱ्याचा मुलगा ऋषिकेश विलास मांडे यांची रेल्वे मध्ये आगार अधीक्षक म्हणून निवड झाली आहे.रेल्वे मध्ये आगार अधीक्षक (Depot Superintendent) आणि सोबतच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांवर निवड झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.  ऋषिकेश मांडे याचा सर्व प्रवास सर्वाना प्रेरणा देणारा आहे . अनेक चढउतार या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आले. मात्र त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही . अनेकदा अपयश आल तेही पचवून घेतले . तथापि त्याच्या या प्रवासात त्याच्या आई वडिलांनी आणि बहिणीने खंबीर साथ दिली. 

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही कुटुंबाने अपार कष्ट करून मुलाला शिकवले. सर्वप्रथम त्याने पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तयारी सुरू केली. नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका संचलित रॉयल अकॅडेमी नारायणगाव येथे अभ्यास सुरु केला. नंतर  मधील काळात त्याने २०२२ मध्ये कॉर्पोरेट मध्ये जॉब करत अभ्यास सुरू ठेवला.

त्याची जिद्द, चिकाटी आणि आधिकारी व्हायचंय  हा ध्यास, कुटुंबाला या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मनोदय व संयम तसेच कुटुंबाची साथ यामुळेच आज तो अधिकारी झाला. नारायणगाव येथील रॉयल अकॅडेमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत ७५ विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या सरकारी नौकरी मध्ये आहेत .  

सन २०२४ मध्ये ३३ विदयार्थी सरकारी सेवेत दाखल झाले तर २०२५ च्या पहिल्या ६ महिन्यातच विकी बिरे (बृहमुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक ), समाधान शेरखाने (विद्युत सहायक पदी ) यांची निवड झाली आहे, २०१९ पासून नारायणगाव मध्ये कार्यरत असणाऱ्या ह्या अकॅडेमीच्या यशात नारायणगावचे लोकनियुक्त माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांचा मोलाचा वाटा आहे, अशी माहिती रॉयल अकॅडमीचे संचालक प्रथमेश वाणी यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड