उपनगरात भारत बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:11+5:302020-12-09T04:09:11+5:30

कात्रज: कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदला पुण्याच्या उपनगरामध्ये प्रतिसाद मिळाला. दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज कोंढवा रोड परिसरामध्ये ...

Suburban India bandh response | उपनगरात भारत बंदला प्रतिसाद

उपनगरात भारत बंदला प्रतिसाद

कात्रज: कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदला पुण्याच्या उपनगरामध्ये प्रतिसाद मिळाला. दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज कोंढवा रोड परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा नगरसेवक प्रकाश कदम यांनी आंदोलन केले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला

या प्रसंगी प्रतिक कदम,प्रणव कदम,राहुल काळे ,सुधीर डावखर विजू पवार, शिवाजी शेंडगे,संजय खोपडे श्रीकांत जाधव,आदी उपस्थित होते.

वाघोलीत भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाघोली: केसनंद फाटा येथे भारत बंदला समर्थन करण्यासाठी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले तेव्हा मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलक उपस्थित होते. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शेतकरी व कामगारांच्या विरोधात केंद्र सरकारने केलेले जाचक कायदे त्वरित मागे घेण्याची मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली.

यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, रामभाऊ दाभाडे,सर्जेराव वाघमारे, डॉ.चंद्रकांत कोलते,चंद्रकांत वारघडे, किसनराव जाधव, दौलत पायगुडे ,शांताराम कटके,संदीप थोरात, धर्मेंद्र सातव,कैलाश सातव, संतोष सातव,ओंकार तुपे आदी उपस्थित होते.

वारजे कर्वेनगमध्ये बंदला समर्थन

कर्वेनगर :भारत बंद समर्थन करण्यासाठी वारजे भागातील सर्व पक्षीय आणि समविचारी संघटना यांनी आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, दिलीप बराटे, सचिन दोडके, जावेद शेख,श्रीकृष्ण बराटे ,बाबा ठान, विठ्ठल वांजळे, प्राची दुधाने, जावेद शेख, देवेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

पाषाण परिसरात कडकडीत बंद

पाषाण : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये पाषाण मधील व्यापारी सहभागी झाले होते यावेळी पाषाण परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

बाणेर बालेवाडी परिसरातही अनेक ठिकाणी दुकाने बंद करून बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला होता. पाषाण गावठाण, सुस रोड ,सुतारवाडी तसेच लिंक रोड परिसरातील दुकाने बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. पाषाण परिसरातील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचा कार्यकर्त्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला होता.

खडकवासला विधानसभा मतदार संघात आंदोलन

धायरी :शेतकऱ्यांना जाचक असणाऱ्या तरतुदी विरोधात सरकारचा महाविकास आघाडी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील वडगांव येथील वीर बाजी पासलकर पुलाजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी स्वाती पोकळे,काका चव्हाण, श्रीरंग चव्हाण, विकास दांगट, अश्विनी खाडे, राहुल मते, मिलिंद पोकळे, दिपाली धुमाळ, प्रवीण शिंदे, बाळासाहेब रायकर, चंद्रशेखर उर्फ दादा पोकळे, संजय अभंग,मनीष जगदाळे, संतोष चाकणकर, किशोर रायकर, संजय पोळ, बाबा ढेबे आदी उपस्थित होते.

Web Title: Suburban India bandh response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.