शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा यांना अन् भरपूर मोबदला मिळवा; महिलेला साडेपाच लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: December 4, 2023 16:23 IST

सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला

पुणे: युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून चांगला पैसे मिळेल असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याच्या प्रकार उंड्री परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३१ ऑक्टोबर २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी उंड्री परिसरात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार यांना अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. युट्युब चॅनेलला सबस्क्राईब केल्यास चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून महिलेला टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना वेगवेगळे टास्क करण्यासाठी दिले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला  देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून महिलेला ५ लाख ४९ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मिळालेला नफा दिसत होता मात्र प्रत्यक्षात पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमWomenमहिलाfraudधोकेबाजी