कुरियर सेवेबाबत ११ जूनपर्यंत अंतिम प्रस्ताव द्या, पीएमपीचे कुरियर कंपनीस सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST2021-05-28T04:09:39+5:302021-05-28T04:09:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी प्रशासन व पुण्यातील दोन कुरियर कंपनी सोबत गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. यात ...

कुरियर सेवेबाबत ११ जूनपर्यंत अंतिम प्रस्ताव द्या, पीएमपीचे कुरियर कंपनीस सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपी प्रशासन व पुण्यातील दोन कुरियर कंपनी सोबत गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. यात पीएमपीने इच्छुक कंपनीस ११ जूनपर्यत अंतिम प्रस्ताव देण्याचे सांगितले आहे. तसेच काही सूचना व शंका असतील तर ते लिखित स्वरूपात पुढील तीन दिवसांच्या आत पीएमपीकडे पाठवावे, असेही सांगण्यात आले आहे.
पीएमपी ही आता कार्गो आणि कुरियर सेवा देणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाटील व गांधी या कंपनीच्या प्रतिनिधी सोबत चर्चा झाली. कुरियर कंपनीच्या प्रतिनिधीने कुरियर साठी नियमित बस वापरणार का? मालवाहतूकिसाठी किती गाड्या वापरल्या जातील असे प्रश्न उपस्थित केले/ त्यावर समाधान कारक चर्चादेखील झाली असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
-----------------------------
पीएमपी सोबत काम करण्यासाठी चार कंपनीने सकारात्मकता दाखविले आहे. पैकी दोन कंपनीसोबत ऑनलाईन चर्चा झाली. ११ जूनपर्यंत त्यांना अंतिम प्रस्ताव देण्यास सांगितले.
-डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,पीएमपीएमएल